Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedयेझदी स्क्रॅम्बलर 350 आणि बीएसए स्क्रॅम्बलर 650 आता पुण्यात उपलब्ध

येझदी स्क्रॅम्बलर 350 आणि बीएसए स्क्रॅम्बलर 650 आता पुण्यात उपलब्ध

 

 

पुणे, 08 जून, 2026: येझदीआणि बीएसए ने आपल्या नवीन स्क्रॅम्बलर बाइक्सच्या रिटेल लाँचिंगची घोषणा केली आहे, ज्या आता पुणे मधील त्यांच्या अधिकृत डीलरशिपवर उपलब्ध आहेत. मूळ स्क्रॅम्बलर वारसा असलेले हे ब्रँड्स वेगवेगळ्या किंमतीत दोन उत्कृष्ट बाइक्स घेऊन आले आहेत, जे अशा रायडर्ससाठी आहेत जे एक असी मशीन शोधत आहेत जी शहरांमध्ये चालवण्यास सोपी, हायवेवर संतुलित आणि आव्हानात्मक रस्त्यांवर रोमांचक असेल. येझदी स्क्रॅम्बलर 350 आणि बीएसए स्क्रॅम्बलर 650 मध्ये खास तयार केलेले पॉवरट्रेन आणि मजबूत, आकर्षक डिझाइन देण्यात आले आहे.

 

भारतातील सर्वात हलकी 350सीसी स्क्रॅम्बलर, चपळ ‘येझदी स्क्रॅम्बलर’ ही शहरातील दैनंदिन प्रवास आणि वीकेंडच्या सफारीसाठी डिझाइन केली गेली आहे. नवीन लिक्विड-कूल्ड ‘कटार’ इंजिन हा या बाइकचा कार्यात्मक आणि संरचनात्मक मुख्य गाभा आहे. मजबूत टॉर्क-टू-वेट रेशो आणि जलद रिस्पॉन्सिव्ह परफॉर्मन्ससह, याची सुरुवातीची किंमत 1,99,950 रुपये आहे.

 

बीएसए स्क्रॅम्बलर 650, ही या सेगमेंटमधील भारतातील एकमेव 650सीसी सिंगल-सिलेंडर इंजिनद्वारे संचलित बाइक आहे. ही बाइक अस्सल ब्रिटिश स्क्रॅम्बलर स्टाइलिंगसह मजबूत लो आणि मिड-रेंज टॉर्क डिलिव्हरीचा उत्तम मेळ घालते. तिचे हे विशेष डिझाइन गोल्ड स्टार कॅटालिना, ए10 स्पिटफायर, आणि ए65 फायरबर्ड सारख्या ऐतिहासिक मॉडेल्सवरून प्रेरित आहे, ज्या बीएसएच्या जगप्रसिद्ध स्क्रॅम्बलर बाइक्स आहेत. ही बाइक 3,24,950 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे.

 

क्लासिक लेजेंड्स चे को-फाउंडर श्री. अनुपम थरेजा म्हणाले, “स्क्रॅम्बलर बाइक्समध्ये मोटरसायकलिंगच्या ‘एसयूव्ही’ बनण्याची क्षमता आहे, ज्या रायडर्सच्या बाइक्स कडून असलेल्या अपेक्षा कायमच्या बदलून टाकतील. आम्हाला आशा आहे की, आत्मविश्वासाने शहर आणि त्यापलीकडे राइड करण्यासाठी बनवलेली आणि येझदीव बीएसएची डिझाइन वैशिष्ट्ये असलेली ही मशिन्स पुणेच्या रायडर्सना वीकेंडला रस्त्यांच्या पलीकडे नवीन मार्ग शोधण्यासाठी प्रेरित करतील. येझदी स्क्रॅम्बलर तिच्या लूक आणि परफॉर्मन्समध्ये एका कशलेल्या आणि बेधुंद वादळासारखी आहे, तर बीएसए स्क्रॅम्बलर तिच्या ब्रिटिश वारशाची अनुभूती देते ज्याने मूळतः जगभरात या फॉरमॅटला प्रेरित केले होते.”

 

आजचे लाँचिंग स्क्रॅम्बलर फॉरमॅटच्या मूळ गरजांनुसार (हलकी, टॉर्क-आधारित आणि रिस्पॉन्सिव्ह) बनवलेल्या दोन नवीन बाइक्ससह, स्क्रॅम्बलर बाइक्सप्रती येझदीआणि बीएसएची बांधिलकी आणखी मजबूत करते.

 

ग्राहक आता नवीन स्क्रॅम्बलर बाइक्स तसेच येझदीआणि बीएसए बाइक्सच्या संपूर्ण रेंजचा अनुभव घेण्यासाठी पुणे मधील त्यांच्या जवळच्या डीलरशिपला भेट देऊ शकतात.

 

सर्व डीलरशिप एकाच छताखाली विक्री, सर्व्हिस आणि आफ्टरसेल्स सपोर्ट देतात. तसेच, कंपनीच्या ‘कस्टमर अश्युरन्स प्रोग्राम’चा पाठबळ लाभले आहे, जो विश्वासार्हता आणि मानसिक शांततेसह दीर्घकालीन मालकीचा अनुभव देण्यासाठी डिझाइन केला गेला आहे, ज्यामध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत:

4 वर्षे/50,000 किमीची स्टँडर्ड वॉरंटी

6 वर्षांपर्यंत एक्सटेंडेड वॉरंटीचे पर्याय

एक वर्षासाठी रोडसाइड असिस्टन्स

देशभरात 400+ सेल्स आणि सर्व्हिस

टचपॉइंट्सवर सपोर्ट

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments