Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे शहरासाठी भूमीगत रस्ते प्रकल्प निश्चित यशस्वी होईल

पुणे शहरासाठी भूमीगत रस्ते प्रकल्प निश्चित यशस्वी होईल

पुणे – शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतील भूमीगत रस्ते प्रकल्प संबंधित यंत्रणांनी राबवावा, त्यासाठी परदेशातील अशा प्रकल्पांची माहिती घ्यावी अशी सूचना माजी नगरसेवक उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम आणि पी एम आय डी ए आयुक्त अभिजित चौधरी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार हेमंत रासने हे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातून विधानसभेवर प्रतिनिधित्व करतात त्यांनी शहरातील रस्ते विशेषता मध्यभागातील रस्ते हे अंडरग्राउंड करावे असा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री यांना दिला होता माननीय मुख्यमंत्री यांनी पीडब्ल्यूडी कडे याची तपासणी feasibility report करण्याकरता आदेश दिले.

या काळात पीएमआरडीए ने हा प्रकल्प करावा असा प्रस्ताव पुढे आला आणि पीएमआरडीएने या संदर्भामध्ये कार्यवाही सुरू केली.

हा प्रकल्प यशस्वी होईल का ? आम्हाला वाटते नक्की होऊ शकतो.

पुणे शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे रस्ते अरुंद असल्याने रहदारीचा प्रश्न फार मोठा आणि गंभीर झालेला आहे जगातला आठवा क्रमांक आपल्याला पुण्यातील प्रवासाच्या वेळेसाठी लागतो असा रिपोर्ट आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सक्षम करण्यासाठी आपण कटिबद्ध होतोच परंतु अशा प्रकारचा रस्ता झाल्यास त्याचा मोठा फायदा हा शहराच्या मध्यवर्ती भागाला आणि शहराच्या बाजूच्या गावांना होऊ शकतो ज्या वाहनांचा पुणे शहरांमध्ये येण्याचा काही उद्देश नाही केवळ रहदारीचा रस्ता म्हणून वापरतात अशी सगळी वाहतूक आपल्याला दूर करता येईल ही मूळ संकल्पना असावी.

हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी तितकाच खर्चिक देखील आहे याला केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या अर्थसाहाय्याशिवाय काही करणे शक्य होईल असे आता वाटत नाही कारण पीएमआरडीए आणि पुणे मनपा यांचे उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित आहेत.

बोस्टन अमेरिका येथे डाउनटाउनला हा प्रकल्प यशस्वी केलेला आहे.

आमच्यापैकी उज्ज्वल केसकर हे सध्या अमेरिकेत असल्यामुळे त्यांनी बोस्टन येथील प्रकल्प प्रत्यक्ष पाहिला आणि योगायोगाने माननीय मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला.

बोस्टन सारखे इतरही अनेक ठिकाणी हा प्रकल्प केलेला आहे.

बोस्टनच्या प्रकल्पाची तपशीलवार माहिती खालील प्रमाणे आहे.

१) 1959 साली 75 हजार गाड्या रोज जातीत असे गृहीत धरून बांधकाम केले होते परंतु दोन लाख गाड्या रोज जायला लागल्याने संपूर्ण शहरांमध्ये ट्रॅफिक जाम कार्बनचे प्रमाण वाढलं त्यामुळे जवळपास 20 हजार कुटुंबांनी स्थलांतर केले मग लक्षात आले की शहर दोन भागांमध्ये विभागले गेले आहे आणि त्याचा तोटा होतो आहे, मग या प्रकल्पाची सुरुवात झाली. काँग्रेसने म्हणजे संसदेने यासाठी मंजुरी दिली अमेरिकेमध्ये संसदेने मंजुरी दिल्याशिवाय निधी उपलब्ध होत नाही.

२) एअरपोर्टला जोडणारा रस्ता समुद्राखालून घेतला हा जगातला पहिला समुद्रा खालचा रस्ता आहे.

३) डाउनटाउन वरून जाणारे सर्व रस्ते हे जमिनी खालून घेतल्यामुळे जवळपास 300 एकर जमीन ही उपलब्ध झाली.

४) समुद्रामध्ये भर टाकून एक नवीन बेट तयार केले.

५) फायदे काय झाले तर ट्रॅफिकचा वेळ जो 19 मिनिटे होता तो 17 मिनिटांनी वाचला त्यामुळे कार्बन फुटप्रिंट कमी झाली.

६) यामध्ये इंजीनियरिंग आव्हान खूप होती

a) दोन लाख गाड्या बंद न करता खालून काम चालू ठेवायचे.

b) शेकडो utility lines हलवायच्या.

c) समुद्राजवळ पाणी नियंत्रित करायचे.

d) आणि हे सगळं शहर बंद न करता करायचे.

e) या प्रकल्पाचे नाव center artery/tunnel project (CA/T Project)

हे सगळे करणे शक्य आहे.

देवेंद्रजींची राजकीय इच्छाशक्ती आहे.

प्रशासकीय इच्छाशक्तीची गरज आहे.

प्रशासनाकडून काम करून घेण्याची लोकप्रतिनिधींची इच्छा हवी त्यामुळे आम्ही मागणी करतो

शहराचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ ज्यांनी हा प्रकल्प मांडला ते आमदार हेमंत रासने दोन्ही शहराचे मुख्य अभियंता यांच्या समावेत पुण्याच्या महापौर स्थायी समिती अध्यक्ष सभागृह नेते अशा सर्वांनी एकदा बोस्टनचा दौरा करून या सर्व प्रकल्पाची पाहणी करावी संबंधित सर्व लोकांशी चर्चा करावी इच्छाशक्ती असेल तर हा प्रकल्प पुण्यामध्ये देखील यशस्वी होईल.

माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना या संदर्भामध्ये आम्ही अवगत केले आहे.

हा प्रकल्प पुण्याचा कायापालट करणारा होईल. या निवेदनाच्या प्रती

धन्यवाद

 

माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस

मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

 

माननीय नामदार एकनाथजी शिंदे

उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री

महाराष्ट्र राज्य

 

माननीय नामदार सुनिताताई पवार

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे जिल्हा

 

माननीय नामदार मुरलीधर मोहोळ

केंद्रीय राज्यमंत्री

 

माननीय नामदार माधुरीताई मिसाळ

नगर विकास राज्यमंत्री

 

आमदार हेमंत रासने यांना सादर करण्यात आल्या आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments