Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorized*श्री महालक्ष्मी मंदिरात झुला उत्सव थाटात साजरा*  सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात...

*श्री महालक्ष्मी मंदिरात झुला उत्सव थाटात साजरा*  सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात अधिक मासानिमित्त विविध कार्यक्रम  

 

 

पुणे : श्री महालक्ष्मी माता की जय… श्री महासरस्वती माता की जय… श्री महाकाली माता की जय… च्या जयघोषात श्री महालक्ष्मी मंदिरात झुला उत्सव साजरा करण्यात आला. तिन्ही देवींच्या मूर्तीसह भगवान श्री विष्णू यांची देखील मूर्ती पाळण्यात विराजमान झाली होती. पाळण्याला फुलांची व फळांची आकर्षक आरास देखील साकारण्यात आली.

 

सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात अधिक महिन्यात हा झुला उत्सव साजरा करण्यात आला. ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांसह विश्वस्त मंडळाने उपक्रमांचे संयोजन केले आहे. यावेळी विश्वस्त ऍड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, नारायण काबरा, हेमंत अर्नाळकर, रमेश पटोदिया, मुरली चौधरी यांसह पदाधिकारी व मंदिराचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

पाळण्यासमोर फुलांची आकर्षक रंगावली साकारण्यात आली. दरवर्षी श्रावण महिन्यात हा उत्सव साजरा केला जातो. मात्र, यंदा अधिक महिन्यात देखील हा उत्सव थाटात साजरा करण्यात आला. शहाळे, आंबा, केळी, लिची, मका, ऊस अशा विविध फळांचा भोग देखील पाळण्याच्या भोवती लावण्यात आला होता. सोमवार, दि. १५ जून पर्यंत दररोज सायंकाळी ५ नंतर मंदिरामध्ये उपक्रम होणार आहेत. तरी देवी भक्तांनी मोठया संख्येने यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments