Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedआंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ साठी पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून व्यापक जनजागृती*

आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ साठी पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून व्यापक जनजागृती*

 

 

पुणे, दि. १३ : आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार २१ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ निमित्त पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत व्यापक जनजागृती आणि सहभाग वाढविण्यासाठी विशेष समन्वय मोहीम राबविण्यात येत आहे.

यावर्षीचा योग दिन “ऑनलाईन” पद्धतीने आयोजित करण्यात येणार असून रविवारी, १४ जून रोजी सकाळी ६.१५ ते ७.१५ या वेळेत ऑनलाइन योग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

योग दिनात जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, क्रीडा संस्था, क्रीडा क्लब तसेच विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे. सहभागींची नोंदणी “One Device, One Participant” या नियमांनुसार स्वतंत्र डिजिटल उपकरणावरून करणे आवश्यक आहे.

पूर्वनोंदणीसाठी सर्व नागरिक, विद्यार्थी, खेळाडू आणि कर्मचारी यांनी अधिकृत टोल-फ्री क्रमांक १८००-३१५-७००८ वर मिस्ड कॉल देऊन नोंदणी पूर्ण करावी. त्यानंतर सहभागींस ऑनलाइन सत्रासाठी आवश्यक लिंक उपलब्ध करून दिली जाईल.

संस्थांनी आपल्या स्तरावर समन्वयक नियुक्त करून विद्यार्थ्यांची व सदस्यांची नोंदणी सुनिश्चित करावी. तसेच इंटरनेट सुविधा, डिजिटल उपकरणे आणि ऑनलाइन सहभागासाठी आवश्यक तांत्रिक तयारी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमानंतर सहभागींचे डिजिटल प्रमाणपत्र उपलब्ध होणार असून संस्थांनी सहभागाचा एकत्रित अहवाल पुणे जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या dsopune6@gmail.com या ईमेलवर सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments