Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorized*'गुरूपेक्षाही अधिक' या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (दि.१६)* स्वामी गोविंद देव...

*’गुरूपेक्षाही अधिक’ या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (दि.१६)* स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांची उपस्थिती ; नंदिनी आचार्य अनुवादित पुस्तक

 

 

पुणे : प.पू. वामन दत्तात्रेय गुळवणी महाराज यांच्या ‘मोअर दॅन अ गुरु’ या श्रीनिवास दत्तात्रेय आचार्य यांनी लिहिलेल्या प्रथम इंग्रजी चरित्राचा त्यांच्या कन्या नंदिनी आचार्य यांनी केलेला मराठी अनुवाद ‘गुरूपेक्षाही अधिक’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार, दि. १६ जून रोजी होणार आहे, अशी माहिती आयोजिका नंदिनी आचार्य व नागेश्री आचार्य यांनी दिली.

 

कोथरूड मयूर कॉलनी येथील एम.ई.एस. ऑडिटोरियम बालशिक्षण मंदिर सभागृह येथे सायं. ५ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्रीराम जन्मभूमि न्यास अयोध्याचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या हस्ते प्रकाशन होणार असून अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.न.म. जोशी असणार आहेत.

 

गुळवणी महाराज आश्रम वासुदेव निवासाचे प्रधान विश्वस्त शरदशास्त्री जोशी हे देखील उपस्थित राहणार आहेत. उत्कर्ष प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले असून सु.वा.जोशी, सविता जोशी, नीलिमा वाडेकर यांनी विशेष सहकार्य केले आहे. तरी पुणेकरांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments