या फादर्स डे निमित्त, फ्रेडरिक कॉन्स्टंट आपल्या नव्याने लाँच केलेल्या क्लासिक वर्ल्डटायमर मॅन्युफॅक्चर घड्याळाच्या माध्यमातून कारागिरी, अचूकता आणि परंपरेच्या मूल्यांवर विशेष प्रकाश टाकत आहे. २०१२ मधील लाँचिंगपासून हे या मेझॉनच्या प्रमुख मॉडेल्सपैकी एक राहिले आहे. या टाइमपीसमध्ये (घड्याळात) आता नवीन मॅन्युफॅक्चर एफसी -719 मुव्हमेंट, वाढीव ७२ तासांचा पॉवर रिझर्व्ह, आकर्षक ४० मिमी केस आणि तारीख नसलेले सुटसुटीत डायल समाविष्ट करण्यात आले आहे.
फ्रेडरिक कॉन्स्टंटच्या स्वतःच्या वर्कशॉपमध्ये विकसित, असेंबल आणि रेग्युलेट करण्यात आलेली एफसी -719 ही मुव्हमेंट, १९८८ नंतरची मेझॉनची ३५ वी मॅन्युफॅक्चर मुव्हमेंट ठरली आहे. हे अद्ययावत क्लासिक वर्ल्डटायमर मॅन्युफॅक्चर मेकॅनिकल इनोव्हेशन आणि आधुनिक डिझाइनचा मेळ घालत एकाच वेळी सर्व २४ टाइम झोन दर्शवण्याचे आपले वैशिष्ट्य पुढे चालू ठेवत आहे.
आज सर्व कुटुंबे वडिलांचा सन्मान करत त्यांच्या अखंड प्रभावाचा उत्सव साजरा करत असताना, हे क्लासिक वर्ल्डटायमर मॅन्युफॅक्चर पिढ्यानपिढ्या चालत आलेली शाश्वत मूल्ये, सूक्ष्म कारागिरी आणि उत्कृष्टतेचा ध्यास यांना दिलेली एक अनोखी मानवंद
ना आहे


