Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedयेरवडा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन*

येरवडा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन*

 

पुणे, दि. १६ (जिमाका, वृत्तसेवा) : सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात सामाजिक न्याय विभागाअंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह येरवडा, (गुणवंत) पुणे येथे इयत्ता ११ व १२ वी नंतर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या अनु. जाती प्रवर्गाच्या विद्यार्थिनींना मोफत शासकिय वसतिगृह प्रवेश देण्यात येणार आहे.

 

वसतिगृह प्रवेश हा प्रवर्ग निहाय गुणवत्तेनुसार राहील. सदर शासकीय वसतिगृहात विनामुल्य निवास, आंथरूण-पांघरुण, भोजन, पुस्तके, स्टेशनरी इतर शैक्षणिक बाबींकरीता आर्थिक सहाय्य, तसेच दरमहा निर्वाह भत्ता इत्यादी सुविधा पुरविण्यात येतात. इच्छुक विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments