Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांसोबत बैठकीचे आयोजन* *सर्व राजकीय...

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांसोबत बैठकीचे आयोजन* *सर्व राजकीय पक्षांना उपस्थित राहण्याचे आवाहन*

 

 

पुणे, 16: मा. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्रासह एकूण १९ राज्य आणि ३ केंद्रशासित प्रदेशामध्ये मध्ये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. मतदार केंद्र प्रतिनिधी यांची सर्व मतदान केंद्रावर नेमणूक करण्यासह विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ यशस्विरित्या राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली १६ जून २०२६ रोजी दुपारी १.३० वाजता सभागृह क्र. १, पाचवा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्व राजकीय पक्षांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस सर्व राजकीय पक्षांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments