Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedसर्वश्रेष्ठ दिव्यांगजन" हा राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या दिव्यांग कलाकार,गायिका अबोली जरीत यांचा पिंपरी...

सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन” हा राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या दिव्यांग कलाकार,गायिका अबोली जरीत यांचा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सन्मान…..

पिंपरी, दि. १६ जून २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रपती पदक विजेत्या “सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन” तसेच इंडियन आयडॉल फेम अबोली जरीत यांचा सन्मान महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला.

 

 

 

यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा, कला, साहित्य आणि सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे,माजी महापौर योगेश बहल,नगरसदस्य शत्रुघ्न काटे,अनिल घोलप, अर्चना करांडे, सुलभा उबाळे, प्रा. उत्तम केंदळे, माजी नगरसदस्या गिरीजा कुदळे, नगरसचिव मुकेश कोळप, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

 

 

 

 

 

याप्रसंगी अबोली जरीत म्हणाल्या, आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने झालेल्या या सन्मानामुळे मला अत्यंत आनंद होत आहे. या शहरात येण्याची आणि येथील विविध उपक्रमांची माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली, याचा मला विशेष आनंद आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आल्यानंतर मला दिव्यांग भवनला भेट देण्याची संधी मिळाली. हे दिव्यांग भवन पाहून मी खरोखरच भारावून गेले. इतक्या सर्वसमावेशक पद्धतीने उभारण्यात आलेले आणि दिव्यांग बांधवांच्या गरजा लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेले असे दिव्यांग भवन मी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. भारतातील पहिले दिव्यांग भवन पाहण्याचा अनुभव माझ्यासाठी अतिशय प्रेरणादायी ठरला,येथे आल्यावर मला असे अजिबात वाटले नाही की मी पहिल्यांदाच या शहरात आले आहे.

 

 

 

माझ्या आयुष्यात अनेक चढ उतार आले. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही अडचणी, संकटे आणि आव्हाने येत असतात. मात्र अशा परिस्थितीत खचून न जाता, स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जात राहणे खूप महत्त्वाचे असते. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी हार मानायची नाही, हे मी स्वतःला नेहमी सांगत आले आहे. संघर्ष हा यशाच्या अडचणींपासून पळून न जाता त्यांचा सामना केल्यास त्यातून नवे मार्ग आणि नवी संधी निर्माण होत असते. त्यामुळे प्रत्येकाने आत्मविश्वासाने पुढे जात राहावे, स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवावा आणि कोणत्याही परिस्थितीत आशा सोडू नये, असेही मत अबोली जरीत यांनी व्यक्त

केले.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments