Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedपक्षांतर करणाऱ्या खासदारां’ची निवडुन दिलेल्या जनतेप्रती प्रतारणा…!  दलबदलू, विकाऊ व विश्वासघातकी...

पक्षांतर करणाऱ्या खासदारां’ची निवडुन दिलेल्या जनतेप्रती प्रतारणा…!  दलबदलू, विकाऊ व विश्वासघातकी खासदारांच्या घरांपुढे इंडीया आघाडी तीव्र निदर्शने करणार …  काँग्रेस’ चा कडक ईशारा …!

 

 

पुणे दि – १६

महाविकास आघाडी’च्या

‘जाहीरनामा व ध्येय – धोरणांवर’ तसेच प्रस्थापित मोदी सरकार’च्या विरोधात मतदान करून, जनतेने निवडून दिलेल्या खासदारांचा ‘भाजप-महायुती प्रवेश’ ही जनतेशी विश्वासघात व प्रतारणा आहे असे झाल्यास, संबंधित मतदार संघातील ‘जनमताचा कौल’ विरोधात कृती करणाऱ्या फीतूर, विश्वासघातकी, खासदारांच्या घरांच्या समोर काँग्रेस इंडीया आघाडी’चे कार्यकर्ते ‘तीव्र निषेध आंदोलन व निदर्शने’ करतील असा ईशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे वरीष्ठ प्रवक्ते (माजी नगरसेवक) गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे दिला.

ते पुढे म्हणाले की, मोदी सरकार’च्या असंवैधानिक व लोकशाही विरोधी सततच्या कृत्यांमुळे, देशाची राष्ट्रीय संपत्ती वाचवण्यासाठी व संविधानाची रक्षा करण्यासाठीच.. मा राहुलजी गांधी यांचे नेतृत्वाखालील काँग्रेस प्रणीत इंडीया आघाडी’ला जनतेने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत स्पष्च कौल दिला असून, जनतेने संसदेत मजबूत विरोधीपक्ष नेता ही दिला आहे.

इतर पक्षांची संख्या सोडून केवळ काँग्रेस’चेच १००% खासदार वाढून ते ५२ वरून १०२ झाले आहेत.

दुसरीकडे,

केंद्रातील सत्ताधारी भाजप’ने सतत स्वायत्त संस्थाचा दुरुपयोग करून, ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स व निवडणूक आयोगाच्या आधारे विरोधकांना नामोहरम व खच्ची करण्याचा सतत प्रयत्न करून व प्रसंगी वेळोवेळी आचार संहिता धुडकावून, सरकारी खर्चाने प्रचंड प्रमाणात प्रचार करूनही, अब की बार ४०० पार म्हणणाऱ्या भाजप’चे २०२४ च्या लोकसभेत, ३५% संख्याबळ कमी होऊन..२४० खासदारांवर संख्या झाली.. हे वास्तव नाकारता येणार नाही.

केवळ नितीशकुमार व चंद्रबाबू नायडू या पक्षांच्या आघारेच केंद्रातील मोदी सरकार २०२४ मध्ये सत्तेवर आले आहेत.. हा देशातील जनतेचा वास्तव कौल असुन, भाजप’ला ३८% च्या वर देशातील जनतेने मतदान केलेले नाही..

मात्र तरी देखील सरासरी तिजोरी व जनतेच्या पैशांवर धाडी घालून, नैतिकता झुगारून, अहंकारी कोडगेपणाने व निर्लज्जपणाने, बेमालूम पणे सत्तापक्षाच्या विरोधी दिलेला कौल.. निवडून आलेले खासदार कथित २/३ संख्याबळाचा व कायद्यातील पळवाटीचा आधार घेत निर्लज्जपणे पक्षांतर करून सत्तेच्या दरोडेखोरांमध्ये सामील होत असतील तर हा ‘लोकशाही’च्या हत्येचा तमाशा’ उघड्या डोळ्याने लोकशाही’चे इतर स्तंभ शांतपणे पाहू कसे शकतात..? असा उपरोधिक व उदीग्न सवाल ही काँग्रेस’ने केला.

तसेच इंडीया आघाडी’च्या उमेदवारांस निवडून देण्यासाठी.. काँग्रेस – इंडीया आघाडी’च्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी देखील परीश्रम घेतले असून मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांचे देखील कष्ट घेतले आहेत हे विसरून चालणार नाही.

महाराष्ट्रात देखील २०२४ लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने, “भाजप’प्रणीत एनडीए”पेक्षा ही “काँग्रेस_इंडीया आघाडी”चेच सु २/३ जास्त खासदार निवडून दिलेत हा सत्य – वास्तव व जनतेचा वास्तव कौल देखील दुर्लक्षित करता येणार नाही असेही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी म्हंटले आहे.

राज्यातील प्रकल्पांमध्ये हजारो कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचे ताशेरे मा उच्चन्यायालयाने लगावले आहेत.

त्यामुळे अनैतिक मार्गाने सत्तेत राहुन, देश व राज्याची साधन संपत्ती चोरांच्या विरोधात मा राहुलजीं च्या भाषेत प्रतिकार करण्यास, काँग्रेस’सह इंडीया आघाडी चे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील व जनतेच्या कौल विरोधात पक्षांतर करणाऱ्या विश्वासघातकी खासदारांच्या घरां पुढे तिव्र “निषेध आंदोलने” करतील असा इशारा ही काँग्रेस’चे वरीष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिला..!

—————————————————————

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments