Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यातील पाणीटंचाई ही मनुष्यनिर्मित आहे ----------------------- कालवा समितीच्या सर्व बैठकांचे वृत्तांत जाहीर...

पुण्यातील पाणीटंचाई ही मनुष्यनिर्मित आहे ———————– कालवा समितीच्या सर्व बैठकांचे वृत्तांत जाहीर करा.

पुणे शहरासाठी किती आणि शेतीसाठी किती पाणी देण्याच ठरवले होते आणि दिले याची एकदा जाहीरपणे तपासणी होणे आवश्यक आहे.अशी मागणी माजी नगरसेवक उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी केली आहे.
ज्यांचे तालुके आणि विधानसभा मतदार संघ आहेत यामध्ये उसाची शेती ही प्रभावी आहे त्या ठिकाणी पाणी जास्त दिले जाते आणि ज्या पुणे शहरात प्रामाणिक टॅक्सपेयर पुणेकर नागरिक राहतात त्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
पाणी वाटपाचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे माणसाला प्रथम पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिल पाहिजे परंतु आज नेमकं उलट झालेलं आहे आणि एक दिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे पाण्याची बचत तर होणार नाहीच उलट जास्त पाणी वापरले जाईल पाणी साठवून ठेवण्याची प्रवृत्ती स्वाभाविकपणे नागरिकांच्या मनामध्ये असते ज्या दिवशी पाणी बंद असते त्याच्या दुसऱ्या दिवशी पाणी प्रेशरने येईल का नाही ही एक भीती पुणेकरांच्या मनात असते यासाठी हा काही मार्ग नाही पण कालवा समितीमध्ये काय ठरले ते पुणेकरांना कळले पाहिजे आणि त्याप्रमाणे पाणीपुरवठ्याची अंमलबजावणी झाली आहे का? पुण्यातल्या सर्व आमदारांनी एकजूट करून विचारले पाहिजे ठरले होते काय आणि झाले काय? पुणेकर मतदार नाहीत का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments