Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedRoblox Kids आणि Roblox Select अकाऊंट्स जागतिक स्तरावर लाँच आता भारतात देखील...

Roblox Kids आणि Roblox Select अकाऊंट्स जागतिक स्तरावर लाँच आता भारतात देखील उपलब्ध

नवीन वय-आधारित अकाऊंट्स मुलांच्या वाढत्या वयानुसार विकसित होणारी सुरक्षितता प्रदान करण्यासाठी आणि पालकांना अधिक देखरेख व नियंत्रण मिळवून देण्यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत

 

नवी दिल्ली, १७ जून – रोब्लॉक्स कॉर्पोरेशनने (NYSE: RBLX) Roblox Kids आणि Roblox Select अकाऊंट्स जागतिक स्तरावर लाँच करत असल्याचे जाहीर केले. हे अकाऊंट्स १६ वर्षांखालील वापरकर्त्यांसाठी वय-आधारित नवीन अनुभव आहे, जे मुलांच्या वाढत्या वयानुसार विकसित होणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेसह डिझाइन करण्‍यात आले आहेत.

गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, नेदरलँड्स आणि न्यूझीलंडमधील मर्यादित बाजारपेठेतील लाँचनंतर (limited market rollout) Roblox Kids आणि Roblox Select अकाऊंट्स आता जगभरात उपलब्ध झाले आहेत. हे अकाऊंट्स गेमचा वापर, चॅटिंगची वैशिष्ट्ये आणि पालकांचे नियंत्रण (पॅरेंटल कंट्रोल्स) वापरकर्त्याच्या वयानुसार सुसंगत ठेवण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत, ज्यामुळे पालकांना रोब्लॉक्सवरील त्यांच्या मुलांच्या अनुभवावर अधिक देखरेख ठेवण्‍यासह स्थिरता मिळते.

वापरकर्त्यांना रोब्लॉक्सच्या वय-तपासणी यंत्रणांच्या आधारे त्यांच्या वयानुसार लागू असलेल्या अकाऊंट श्रेणीमध्ये स्वयंचलितपणे समाविष्ट केले जाते. ही नवीन व्यवस्था वय-तपासणी, वय-आधारित अकाऊंट सेटिंग्ज, कंटेंट रेटिंग्ज, सतत चालणारी देखरेख आणि पालकांच्या विस्तारित नियंत्रणास एकाच चौकटीत एकत्र आणते. हे लहान वापरकर्त्यांच्या वाढत्या वयानुसार त्यांना साहाय्य करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. हे अकाऊंट्स सुरू झाल्यानंतर वय तपासलेले १६ वर्षांखालील वापरकर्ते त्यांच्या बहुतांश आवडत्या गेम्सचा वापर करू शकतील, तर वय तपासलेले १६ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वापरकर्त्यांच्या अनुभवात कोणताही बदल होणार नाही.

“मुलांच्या गरजा त्यांच्या वाढत्या वयानुसार लक्षणीयरित्या बदलतात आणि ऑनलाइन अनुभवांमध्येही त्यानुसार बदल झाले पाहिजेत,” असे रोब्लॉक्सचे चीफ सेफ्टी ऑफिसर मॅट कॉफमन म्हणाले. “Roblox Kids आणि Roblox Selectच्या माध्यमातून आम्ही वय-आधारित सुरक्षितता डिझाइन करत आहोत, जे वेगवेगळ्या टप्प्यांवर लहान वापरकर्त्यांना साहाय्य करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. तसेच, याद्वारे पालकांना त्यांच्या कुटुंबाच्या गरजेनुसार हा अनुभव वैयक्तिकृत करण्याची साधने देखील मिळत आहेत.”

Roblox Kids आणि Roblox Select अकाऊंट्स

Roblox Kids अकाऊंट्स (वय ५ ते ८ वर्षे)*, यामध्ये प्लॅटफॉर्मवरील सर्वात मजबूत डीफॉल्ट सुरक्षितता समाविष्ट आहे. वापरकर्ते रोब्लॉक्सच्या निरंतर निवड प्रक्रियेतून उत्तीर्ण झालेल्या अत्यंत कमी किंवा सौम्य परिपक्वता श्रेणीतील (content maturity labels) गेम्सच्या कॅटलॉगचा वापर करू शकतात. यामध्ये चॅटिंगचे वैशिष्ट्य आधीपासून बंद असते.

Roblox Select अकाऊंट्स (वय ९ ते १५ वर्षे) मध्यम परिपक्वता श्रेणीपर्यंतच्या आणि रोब्लॉक्सच्या निरंतर निवड प्रक्रियेतून उत्तीर्ण झालेल्या गेम्सचा वापर करण्याची सुविधा देतात. चॅट सेटिंग्ज (Chat settings) वयानुसार आणि प्रांतानुसार बदलतात, तसेच १६ वर्षांखालील वापरकर्त्यांसाठी अतिरिक्त सुरक्षा उपाय लागू राहतात.

दोन्ही प्रकारच्या अकाऊंट्ससाठी, रोब्लॉक्स लहान वापरकर्त्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या गेम्सवर अतिरिक्त पुनरावलोकन मानक लागू करते. यामध्ये डेव्हलपर पडताळणी, रिअल-टाइम मूल्यमापन आणि प्रगत कंटेंट पुनरावलोकन यांचा समावेश आहे. Roblox Kids आणि Roblox Selectच्या कॅटलॉगमधून संवेदनशील विषय, सोशल हँगआउट्स आणि फ्री-फॉर्म ड्रॉइंग यांसारखी वैशिष्ट्ये असलेले गेम्स आधीपासून वगळण्यात आले आहेत.

रोब्लॉक्सची ही वय-आधारित अकाऊंट यंत्रणा वापरकर्त्यांचे वय वाढेल त्यानुसार त्यांना स्वयंचलितपणे नवीन अकाऊंट श्रेणीत समाविष्ट करते: वापरकर्ते ९ वर्षे वय झाल्यावर Roblox Kids मधून Roblox Select मध्ये जातात, तर १६ वर्षे वय झाल्यावर Roblox Select मधून नियमित रोब्लॉक्स अकाऊंटमध्ये जातात.

पालकांच्या नियंत्रणाचा (पॅरेंटल कंट्रोल्सचा) विस्तार

रोब्लॉक्स पालकांचे नियंत्रण (parental controls) देखील वाढवत आहे. ज्या पालकांनी आपले अकाऊंट मुलांच्या अकाऊंटशी जोडले आहे, त्यांना आधीपासूनच अशा नियंत्रणांची सुविधा उपलब्ध आहे, ज्याद्वारे गेम खेळण्याच्या पद्धती आणि मित्रांच्या यादीवर लक्ष ठेवता येते. तसेच कंटेंट रेटिंग्‍ज, संवादाचे सेटिंग्ज, स्क्रीनवर घालवलेला वेळ आणि पैसे खर्च करण्याच्या मर्यादा व्यवस्थापित करण्यासाठीची साधने देखील याद्वारे मिळतात.

या नवीन सुविधेसह, रोब्लॉक्स मुलाचे वय १६ वर्षे होईपर्यंत विशिष्ट नियंत्रणे वाढवत आहे, ज्यामध्ये विशिष्ट गेम ब्लॉक करणे आणि प्रत्‍यक्ष चॅटचे व्यवस्थापन करणे समाविष्ट आहे. तसेच कंपनी गेम मंजुरीचे एक नवीन वैशिष्ट्य देखील आणत आहे, ज्यामुळे पालकांना त्यांच्या मुलाच्या आधीपासून सेट असलेल्या अकाऊंट सेटिंग्जव्यतिरिक्त इतर विशिष्ट गेम्स वापरण्याची परवानगी देण्याचा अधिकार मिळेल.

एसआरडीएव्ही पब्लिक स्कूलच्या आयटी प्रमुख आणि रोब्लॉक्सच्या ग्लोबल पेरेंट कौन्सिलच्या सदस्या विनीता गर्ग म्हणाल्या, “एक शिक्षक आणि पालक समर्थक या नात्याने, मी रोब्लॉक्सने सुरू केलेल्या वय-आधारित अकाऊंट्सचे स्वागत करते, जे मान्य करते की मुले मोठी होतात तशा त्यांच्या ऑनलाइन गरजा बदलतात. Roblox Kids आणि Roblox Select ची सुरुवात हे पालकांना अधिक स्पष्टता आणि नियंत्रण देताना मुलांसाठी अधिक सुरक्षित आणि वयाला साजेसे डिजिटल अनुभव तयार करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. विशेषतः वयानुसार मिळणारे संरक्षण, पालकांच्या नियंत्रणाचा झालेला विस्तार आणि संवाद व कंटेंट अॅक्सेसच्या बाबतीत घेतलेली काळजी यामुळे मला अधिक प्रोत्साहन मिळाले आहे. भारतासारख्या देशात, जिथे लहान वयापासून ऑनलाइन सक्रिय असणाऱ्या मुलांची संख्या वाढते आहे, तिथे कुटुंबांना व्यावहारिक साधने आणि पारदर्शकतेद्वारे सक्षम करणे विशेष महत्त्वाचे आहे. हे बदल पालकांना त्यांच्या मुलांसाठी अधिक सुरक्षित आणि सकारात्मक डिजिटल अनुभवांना पाठबळ देण्यास मदत करू शकतात.”

वयानुसार योग्य अनुभव

हा बदल लहान वापरकर्त्यांसाठी वयानुसार योग्य अनुभव तयार करण्याच्या रोब्लॉक्सच्या व्यापक प्रयत्‍नांचा भाग आहे. चॅटिंगचे वैशिष्ट्य वापरण्यासाठी चेहऱ्याद्वारे वय-तपासणी (facial age checks) अनिवार्य करणारा रोब्लॉक्स जगातील पहिला मोठा ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म बनला आहे. हा बदल पूर्ण झाल्यानंतर, ज्या वापरकर्त्यांनी आपली वय-तपासणी पूर्ण केलेली नाही, त्यांना त्यांचे वय काहीही असले तरी नियमित रोब्लॉक्स अकाऊंट वापरता येणार नाही किंवा रोब्लॉक्स चॅट वैशिष्ट्यांचा वापर करता येणार नाही.

रोब्लॉक्स चॅटमध्ये लिंक्स, फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यापासून रोखण्यासाठी डिझाइन केलेली सुरक्षा देखील सातत्याने लागू ठेवत आहे. चॅटमध्ये सोशल मीडिया लिंक्स वापरण्याची परवानगी कधीच नव्हती, पण या महिन्याच्या अखेरीस रोब्लॉक्स १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या वापरकर्त्यांना युझर प्रोफाईल, गेम डिटेल पेजेस्, कम्युनिटी पेजेस् किंवा क्रिएटर हबवर या लिंक्स शेअर करण्याची किंवा पाहण्याची परवानगी देणार नाही.

या वर्षाच्या उत्तरार्धात, रोब्लॉक्स इंटरनॅशनल एज रेटिंग कोअलिशन (आयएआरसी) फ्रेमवर्ककडे वळण्यास (transitioning to the International Age Rating Coalition (IARC) framework,) सुरुवात करेल. ही डिजिटल गेम्स आणि अॅप्ससाठी वय-आधारित वर्गीकरण निश्चित करणारी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त मानक पद्धत आहे.

हे सर्व अपडेट्स वापरकर्त्यांच्या वाढत्या वयानुसार विकसित होणारी सुरक्षा प्रदान करण्यासाठी, पालकांना अधिक पारदर्शकता व नियंत्रण मिळवून देण्यासाठी आणि सुरक्षित व सकारात्मक ऑनलाइन अनुभवांना प्रोत्साहन देण्यासाठी रोब्लॉक्सद्वारे सातत्याने केल्या जाणाऱ्या कामाचा भाग आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments