Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedहंगामा ओटीटीवर 'पर्सनल ट्रेनर 2'चे पुनरागमन – महत्त्वाकांक्षा, आकर्षण आणि धोकादायक रहस्यांची...

हंगामा ओटीटीवर ‘पर्सनल ट्रेनर 2’चे पुनरागमन – महत्त्वाकांक्षा, आकर्षण आणि धोकादायक रहस्यांची थरारक कथा

टीना दत्ता, आकांक्षा पुरी, राहुल सुधीर आणि पूनम पांडे यांच्या प्रमुख भूमिका~

 

18 जून 2026 – पहिल्या सीझनला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर हंगामा ओटीटीने आपली बहुप्रतीक्षित ओरिजिनल वेब सीरिज ‘पर्सनल ट्रेनर 2’ 18 जून 2026 रोजी प्रदर्शित केली आहे. मुंबईतील उच्चभ्रू फिटनेस क्षेत्राच्या ग्लॅमरस पण तितक्याच निर्दयी वातावरणावर आधारित या मालिकेत टीना दत्ता, आकांक्षा पुरी, पूनम पांडे आणि राहुल सुधीर प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. रहस्य, प्रेम, सत्तासंघर्ष आणि अनपेक्षित घडामोडींनी भरलेली ही सिरीज प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा अनुभव देणार आहे.

 

मुंबईतील एका प्रतिष्ठित जिममध्ये घडणारी ही कथा आहे. येथे सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर्स आणि शहरातील उच्चभ्रू लोक आपल्या गुप्तपणे व्यायामासाठी येतात. चमकदार वातावरण आणि फिट शरीरांच्या मागे मागे फसवणूक आणि सत्तेचे खेळ सुरू असतात. महत्त्वाकांक्षेच्या झगमगाटाखाली एक वेगळेच धोकादायक जग दडलेले आहे, जिथे आकर्षण हे एक हत्यार बनते, प्रत्येक कृतीत विश्वासघात दडलेला असतो आणि इच्छा माणसाला मर्यादेपलीकडे नेते. नाती बदलतात, मैत्री तुटते आणि परिस्थिती अधिकच धोकादायक बनत जाते. या जगात खरी ताकद केवळ शरीरात नसून, परिस्थिती आपल्या बाजूने वळवण्यात, टिकून राहण्यात आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात असते.

 

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना टीना दत्ता म्हणाली, “नेहा या व्यक्तिरेखेने मला सर्वप्रथम तिच्या अनेक पैलूंमुळे आणि अनपेक्षित स्वभावामुळे आकर्षित केले. ती बाहेरून जशी दिसते, तशी प्रत्यक्षात नसते. कथा पुढे जात असताना प्रेक्षकांना तिच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक नवे पैलू पाहायला मिळतील. तिच्या स्वभावातील विविध पैलू समजून घेऊन त्या पडद्यावर साकारताना मला खूप आनंद झाला. हे असे पात्र आहे जे सतत प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडते आणि मला वाटते की तिची कथा हळूहळू उलगडताना प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”

 

आपल्या भूमिकेबद्दल सांगताना आकांक्षा पुरी म्हणाली, “माया ही अत्यंत महत्त्वाकांक्षी, धाडसी आणि कोणत्याही आव्हानाला न घाबरणारी व्यक्ती आहे. फिटनेसच्या जगाशी संबंधित ही भूमिका साकारताना मला विशेष आनंद झाला, कारण यात मला शारीरिक मेहनतीसोबतच भावनाही व्यक्त करण्याची संधी मिळाली. मायाबद्दल मला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे ती खंबीर आहे, पण तिच्यात काही अशा भावनिक बाजूही आहेत ज्या लोकांना अपेक्षित नसतील. ‘पर्सनल ट्रेनर 2’मध्ये अनेक अनपेक्षित वळणे, नाट्यपूर्ण प्रसंग आणि गुंतागुंतीची नाती पाहायला मिळतील. त्यामुळे प्रेक्षक पहिल्याच भागापासून या मालिकेत गुंतून जातील, असा मला विश्वास आहे.”

 

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना राहुल सुधीर म्हणाला, “‘पर्सनल ट्रेनर 2’ची खास गोष्ट म्हणजे ही सिरीज केवळ फिटनेसच्या जगापुरती मर्यादित नाही. प्रत्येक पात्राच्या आयुष्यात काही रहस्ये, महत्त्वाकांक्षा आणि भावनिक संघर्ष आहेत, ज्यामुळे कथा अधिक रंजक बनते. ऋषी अशा परिस्थितींमध्ये अडकतो जिथे कोणावर विश्वास ठेवणे कठीण होते आणि प्रत्येक निर्णयाचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे त्याचा प्रवास अधिक रोमांचक ठरतो.”

 

पूनम पांडे म्हणाली, “त्रिशा ही अशी महिला आहे जिला नेमके काय हवे आहे हे चांगले माहीत असते आणि ते मिळवण्यासाठी ती धाडसी पावले उचलण्यास अजिबात घाबरत नाही. ती स्वतःच्या उद्देशांसह कथेत प्रवेश करते आणि संपूर्ण जिममधील समीकरणे बदलून टाकते. आत्मविश्वासपूर्ण, प्रभावी आणि अनपेक्षित स्वभावाचे पात्र साकारताना मला खूप आनंद मिळाला. प्रेक्षकांना या मालिकेत अनेक धक्कादायक वळणे आणि आश्चर्यकारक घडामोडी पाहायला मिळतील.”

 

नाट्यपूर्ण प्रसंग, दमदार अभिनय आणि रहस्यांनी भरलेली ‘पर्सनल ट्रेनर 2’ सिरीज प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याचे आश्वासन देते. ही मालिका आता हंगामा ओटीटीवर स्ट्रीम होत असून टाटा प्ले बिंज, वॉचो, बीएसएनएल, प्लेबॉक्सटीव्ही, रेलवायर ब्रॉडबँड, एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले आणि डोर टीव्ही या प्लॅटफॉर्मवरही पाहता

येणार आहे.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments