नवी मुंबईत दिवसेंदिवस पाणी टंचाईची समस्या बिकट होत चालली आहे.
अशा परिस्थितीत, नवी मुंबई महापालिका प्रशासनाने / सिडकोने जी पाण्याची पाईपलाईन मिलेनियम टॉवर्स सह्याद्री गृह निर्माण संस्था, सेक्टर 9, सानपाडा, नवी मुंबई या संस्थेस दिली आहे, त्या पाईपलाईनवर, शेजारील मिलेनियम टॉवर्स सिमफनी गृह निर्माण संस्थेने बेकायदेशीरपणे कुलूप लावले असून त्यांच्या मर्जीने ते मिलेनियम टॉवर्स सह्याद्री गृह निर्माण संस्थेस पाणी सोडत आहेत. त्यामुळे मिलेनियम टॉवर्स सह्याद्री गृह निर्माण संस्थेस प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईच्या भीषण समस्येस तोंड द्यावे लागत आहे. यामुळे रहिवाश्यांमध्ये
प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
या समस्येवर सामोपचाराने उपाय शोधण्याचे मिलेनियम टॉवर्स सह्याद्री गृह निर्माण संस्थेचे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत. त्यामुळे आता हे कुलूप तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील, अशी रीतसर मागणी
मिलेनियम टॉवर्स सह्याद्री गृह निर्माण संस्थेच्या पदाधिकाकार्यानी
सानपाडा पोलीस ठाण्याचे
वरीष्ठ पोलीस निरीक्षक
श्री देवीदास कठाळे यांना
समक्ष भेटून , लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या प्रकरणी दुसर्या संस्थेची बाजू ऐकून तात्काळ योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन
वरीष्ठ पोलीस निरीक्षक
श्री देवीदास कठाळे यांनी या पदाधिकाऱ्यांना दिले.
हे निवेदन मिलेनियम टॉवर्स सह्याद्री गृह निर्माण संस्थेचे अध्यक्ष श्री देवेंद्र भुजबळ ,
सचिव श्री सुनील पाटील,
कार्यकारिणी सदस्य सर्वश्री
राजकुमार शेठ, श्रीकांत जोशी, विश्वनाथ मूल्या यांनी दिले.


