Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन*

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन*

 

 

*नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन*

 

पुणे, दि. १९ : जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, सेवाभावी शैक्षणिक संस्था, क्रीडा संकुले, क्रीडा मंडळे, क्रीडा संघटना, युवक मंडळे, महिला मंडळे तसेच क्रीडा क्षेत्रात कार्यरत संस्थांनी अधिकाधिक लोकसहभागासह आंतरराष्ट्रीय योग दिनाचे कार्यक्रमाचे आयोजन करावे, २१ जून २०२६ रोजी सकाळी ७ ते ७.४५ या वेळेत अधिकृत सामूहिक योग प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच स्थानिक गरजेनुसार इतर योग व तंदुरुस्तीविषयक उपक्रमांचे आयोजन करून नागरिकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

 

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०१९ मध्ये सुरू केलेल्या ‘फिट इंडिया मूव्हमेंट’चा उद्देश प्रत्येक नागरिकाने तंदुरुस्तीचा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून स्वीकार करावा हा आहे. या संकल्पनेच्या अनुषंगाने देशभर योग व विविध शारीरिक तंदुरुस्तीच्या उपक्रमांद्वारे नागरिकांना नियमित व्यायामासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.दरवर्षी २१ जून रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय योग दिन हा योगाला सर्वांगीण आरोग्य व कल्याणासाठी जीवनपद्धती म्हणून प्रोत्साहन देणारा उपक्रम आहे. यावर्षीच्या १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची अधिकृत संकल्पना “निरोगी वृद्धत्वासाठी योग”अशी आहे.

 

योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती, छायाचित्रे, पेपर कात्रणे, सहभागी युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिकांची संख्या आदींचा सविस्तर अहवाल कार्यक्रमानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या dsopune6@gmail.com या ई-मेलवर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

*आंतरराष्ट्रीय योग दिनाचे स. प. महाविद्यालय मैदान येथे आयोजन*

पुणे महानगरपालिका व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून २०२६ रोजी स. प. महाविद्यालय मैदान, पुणे येथे ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’आयोजन करण्यात येणार आहे. सकाळी ६ वाजता उपस्थिती नोंदणी होणार असून सकाळी ७ ते ७.४५ या वेळेत सामूहिक योग सत्र होणार आहेत. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या दिनात सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय योग दिन यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments