पुणे पुणे शहरातील मुळा-मुठा नदी व विविध तलावातील जलपर्णी यांत्रिकी पद्धतीने काढण्याची मागणी माजी नगरसेवक उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. यासंबंधी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की
पुणे शहरातील मुळा मुठा नदी आणि विविध तलावांमधील जलपर्णी यांत्रिकी पद्धतीने काढण्यासाठी गेल्या ४ वर्षात ७ कोटी ९७ लाख रुपयांचा खर्च झाला आहे असे प्रशासनाने सभागृहात लेखी प्रश्नाला उत्तर दिले आहे परंतु परिस्थिती वेगळीच आहे
पाषाण तलाव:- ३.२७ कोटी + १ कोटी चालू वर्षी
मुळा मुठा नदी:- ५.२० कोटी + १.५० कोटी चालू वर्षी
कात्रज तलाव:- २.५९ + १ कोटी चालू वर्षी
जांभूळवाडी तलाव:- १.२५ + चालू वर्षी ८० लाख
रामनदी:- चालू वर्षी ५० लाख
असे एकूण:- १६.६१ कोटी रुपये मागील ४ वर्षीत जलपर्णी काढण्यासाठी खर्च केला आहे
मुळा मुठा नदीत तर खूप मोठा झोल आहे तुम्हाला आधी सांगितले होते. आता पण आपण वारजे पुलावरून खडकवासल्याच्या दिशेने बघितले तर संपूर्ण नदी जलपर्णी ने भरलेली आहे पूर येण्याची वाट बघितली जात आहे. म्हणजे जलपर्णी पूरात वाहून जाईल किंवा भिडे पुलाला येऊन अडकली कि मग ती बाहेर काढली जाणार
८ दिवस काम करून १.५ कोटी बिल काढले जाते. आणि ८०% जलपर्णी मांजरीच्या पुढे ढकलून दिली जाते किंवा पुरात वाहून जाते. आणि मग त्याची बिल काढली जातात.
याबाबत नवीन तंत्रज्ञानानुसार नेमके किती काम झाले आहे याचा आढावा आपण घ्यावा आणि मगच ठेकेदारांना बिले अदा करावीत
गेली अनेक वर्ष एकच कंत्राटदार याच्यामध्ये काम करत आहे आणि तो एका नेत्याच्या अत्यंत जवळचा आहे त्यामुळे आमचे हात बांधले आहेत. असे अधिकारी सांगत असतात कृपया आपण यात लक्ष घालावे अशी विनंती आहे. या निवेदनाच्या प्रती त्यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांना सादर केल्या आहेत.


