Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorized*छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिंहगडावर स्वच्छता मोहिम संपन्न्**

*छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिंहगडावर स्वच्छता मोहिम संपन्न्**

 

 

पुणे, दि. १९ (जिमाका, वृत्तसेवा) : छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीचे औचित्य साधून सारथी संस्थेच्यावतीने सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सारथीचे व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी तसेच सारथी पुणे विभागीय कार्यालयाचे उपव्यवस्थापकीय संचालक अनिल पवार व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

 

मोहिमेदरम्यान किल्ल्यावरील प्लास्टिक व इतर घनकचरा संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला. ऐतिहासिक वारशाचे जतन, गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत ऐतिहासिक व पर्यावरणीय संवर्धनासाठी योगदान देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. सहभागी विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला, अशी माहिती सारथी विभागीय कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments