Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedवाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण कामकाज रविवारी सुरू राहणार*

वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण कामकाज रविवारी सुरू राहणार*

 

 

पुणे, दि. १९: वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे काम वेळेत पूर्ण व्हावे तसेच वाहनचालक व वाहनमालकांची गैरसोय टाळण्यासाठी मौजे दिवे येथे रविवार, २१ जून २०२६ रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशीही कामकाज सुरू राहणार आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी कळविले आहे.

 

वाहन चालक, वाहनमालक तसेच विविध वाहन संघटनांनी आपल्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्यासाठी संबंधित कार्यालयात वाहने तपासणीसाठी सादर करावीत, तसेच सर्व स्कूल बस चालक व मालकांनी आपल्या स्कूल बसची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करून घ्यावे. स्कूल बस वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाला प्राधान्य देण्यात येणार आहेही श्री. भोसले यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments