Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorized*पिंपरी विधानसभा मतदार संघातर्फे राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक संपन्न....*

*पिंपरी विधानसभा मतदार संघातर्फे राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक संपन्न….*

 

 

 

*पिंपरी, दि. १९ जून २०२६ :-* भारत निवडणूक आयोगामार्फत महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणारे विशेष सखोल पुनरीक्षण मोहीमेबाबत सर्वोतपरी माहिती देणेसाठी राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्ष प्रतिनिधिची बैठक २०६ पिंपरी (अ. जा) विधानसभा मतदारसंघातर्फे घेण्यात आली. या बैठकीला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीमध्ये सर्वाना विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेतील सविस्तर कामकाज,वेळापत्रक आदी माहिती मतदार नोंदणी अधिकारी अर्चना यादव यांनी दिली. तसेच ३० जून २०२६ पासून एन्युमरेशन फॉर्म (enumeration form) चे वाटप मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेमार्फत सुरू होणार असून प्रारूप मतदार यादी ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच त्यानंतर हरकतीवर सुनावणी घेऊन मुख्य यादी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे. या मोहिमेसाठी राजकीय पक्षांनी यादी भाग निहाय बीएलए – २ नियुक्त करणे आवश्यक असून या कालावधीत मतदार यादी अद्ययावत व अचूक करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याने, त्यामध्ये सर्व राजकीय पक्षांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे अर्चना यादव यांनी सांगितले. याप्रसंगी उपस्थित पक्ष पदाधिकारी,प्रतिनिधींनी प्रशासनास सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments