Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedअविवा इंडियाकडून बाणेर आणि शिवाजीनगरमध्ये नवीन शाखांसह पुण्यात विस्तार*

अविवा इंडियाकडून बाणेर आणि शिवाजीनगरमध्ये नवीन शाखांसह पुण्यात विस्तार*

 

 

पुणे, २२ जून २०२६: अविवा लाईफ इन्शुरन्सने बाणेर आणि शिवाजीनगर येथे दोन नवीन शाखांचे उद्घाटन करून पुण्यात आपला विस्तार केला आहे. हा विस्तार शहरातील नागरिक आणि कुटुंबांना अधिक सुलभपणे वैयक्तिकृत संरक्षण व आर्थिक नियोजन उपाययोजना देण्याच्या अविवाच्या वचनबद्धतेला अधिक दृढ करतो.

 

पुण्यातील दोन प्रमुख विकास मार्गिकांमध्ये असलेल्या या नवीन शाखा वैयक्तिकृत सल्ला आणि डिजिटल सेवा यांचा सुरेख संगम साधण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. ग्राहक जलद सेवा साहाय्य आणि अधिक सल्लागार स्वरूपाच्या संवाद अनुभवाचा लाभ घेताना जीवन विमा योजनांच्या विस्तृत श्रेणीचा लाभ घेऊ शकतात.

 

अविवा आपल्या विश्वसनीय सेवा आणि संरक्षण उपाययोजनांद्वारे ग्राहकांचा विश्वास सातत्याने वाढवत असतानाच्या काळात हा विस्तार झाला आहे. हा विश्वास कंपनीच्या तिच्या ९९.१८% च्या क्लेम सेटलमेंट रेशोमध्ये दिसून येतो.

 

या प्रसंगी बोलताना अविवा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. असित रथ म्हणाले:

 

पुणे हे भारतातील सर्वात गतिमान आणि वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. या शहरात दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा आणि संरक्षणाबद्दल जागरूकता वाढत आहे. आमच्या बाणेर आणि शिवाजी नगर शाखांचे उद्घाटन ग्राहकांसाठी संरक्षण, आरोग्य आणि विमा उपाय अधिक सुलभ करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. डिजिटल वापर वाढत असला तरी व्यक्ती आणि कुटुंबांना माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी विश्वासार्ह मानवी मार्गदर्श महत्त्वाचे ठरते या गोष्टीवर आमचा विश्वास आहे. या नवीन शाखांमुळे आम्हाला ग्राहकांना अधिक उत्तम सेवा देता येईल आणि आरोग्य व आर्थिक सुस्थितीबद्दलचा आमचा दृष्टीकोन विस्तारता येईल. तसेच ग्राहकांसाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि वैयक्तिक मार्गदर्शन उपलब्ध होईल.

 

या विस्तारातून आपले वितरण जाळे मजबूत करण्यासाठी आणि प्रमुख विकास बाजारपेठांमध्ये आपली उपस्थिती अधिक दृढ करण्यासाठी अविवाच्या सातत्यपूर्ण गुंतवणुकीवर भर दिल्याचे दिसते. संरक्षणकेंद्रित आर्थिक उपाय ग्राहकांच्या अधिक जवळ आणून अविवा व्यक्ती आणि कुटुंबांना दीर्घकालीन आर्थिक लवचिकता निर्माण करण्यास आणि आत्मविश्वासाने त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यास मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments