Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्लिअरट्रिपकडून 'क्रिएटर्स क्लब' लाँच, प्रवासाच्या महत्त्वाकांक्षेचे व्यावसायिक फायद्यात (कॉमर्स फ्लायव्हील) रूपांतर करणार

क्लिअरट्रिपकडून ‘क्रिएटर्स क्लब’ लाँच, प्रवासाच्या महत्त्वाकांक्षेचे व्यावसायिक फायद्यात (कॉमर्स फ्लायव्हील) रूपांतर करणार

नवी दिल्ली, जून २४ २०२६: क्लिअरट्रिप या फ्लिपकार्ट कंपनी आणि भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या ऑनलाईन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मने क्लिअरट्रिप क्रिएटर्स क्लबच्‍या लाँचची घोषणा केली आहे. हा एक सुनियोजित संलग्न उपक्रम आहे, जो क्रिएटर्सच्या कन्टेंटला प्रत्‍यक्ष बुकिंग प्रक्रियेत समाविष्ट करतो. यामुळे क्रिएटर्सच्या प्रभावाचे रूपांतर विकासात्‍मक आणि उत्पन्न मिळवून देणाऱ्या व्यावसायिक माध्यमात होईल.

 

क्लिअरट्रिप क्रिएटर्स क्लब पारंपारिक पे-पर-कन्टेंट (प्रति कन्टेंट पैसे देणे) मॉडेलच्या पलीकडे जाऊन क्रिएटर्सना कामगिरीवर आधारित कमिशन रचनेद्वारे प्रत्‍यक्ष बुकिंग प्रक्रियेत समाविष्ट करतो. यामुळे क्रिएटर्स केवळ जाहिरातदार न राहता कमाईमधील भागीदार बनतात. फॉलोअर्सच्या किमान संख्येची कोणतीही अट नसलेला आणि प्रेक्षकांच्या संख्येपेक्षा त्यांच्या सहभागावर पात्रता ठरवणारा हा उपक्रम सर्व स्तरांतील आणि श्रेणींमधील क्रिएटर्ससाठी खुला आहे. रचनेनुसार, क्रिएटर्सचा पाया जितका विस्तृत असेल, तितकाच हा उपक्रम अधिक दृढ होईल.

 

भारतामध्ये प्रवासाचे निर्णय आता केवळ सर्च बारवर (शोध घेण्यापुरते) मर्यादित राहिलेले नाहीत. सोशल मीडिया हे विशेषतः जेन झेड आणि मिलेनियल्स पिढीसाठी पर्यटनाच्या क्षेत्रातील सर्वात शक्तिशाली माध्यम बनले आहे, जिथे ही पिढी ठिकाणांच्या निवडीपासून ते प्रत्‍यक्ष बुकिंगच्या निर्णयांपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी कन्टेंट क्रिएटर्सवर अवलंबून असते. क्लिअरट्रिपच्या पीकअबु ट्रेंड्स ट्रॅकरनुसार, हा बदल आता केवळ मेट्रो शहरांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर द्वितीय श्रेणीतील बाजारपेठा देखील पर्यटन आणि मनोरंजनासाठीच्या प्रवासात वेगाने सक्रिय होत आहेत आणि त्यांच्या या इच्छेमागे क्रिएटर्स हेच मुख्य कारण आहेत.

 

क्लिअरट्रिपच्या चीफ मार्केटिंग अँड रेव्हेन्यू ऑफिसर पल्लवी सक्सेना म्हणाल्या, “जेन झेड पिढीने प्रवासाचे निर्णय घेण्याच्या पद्धतीमध्ये मुलभूत बदल केला आहे. एखाद्या ट्रिपची इच्छा आणि प्रेरणा आता सोशल मीडिया फीडवरून सुरू होते आणि क्रिएटर्स या बदलाच्या केंद्रस्थानी आहेत. भारतातील पर्यटनाच्या विकासाची पुढची लाट अशा बाजारपेठांमधून आणि ग्राहकांकडून येईल, जिथे कोणत्याही पारंपारिक माध्यमापेक्षा क्रिएटर्सचा प्रभाव जास्त आहे. क्लिअरट्रिप क्रिएटर्स क्लबच्या लाँचमुळे क्रिएटर्सना सर्वोत्तम पायाभूत सुविधा मिळेल, ज्याद्वारे ते त्यांच्या प्रत्येक पोस्टचे रूपांतर उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये आणि प्रत्येक बुकिंगचे रूपांतर अधिक नवीन प्रेरणेमध्ये करू शकतील. आम्ही याच व्यावसायिक चक्राची (फ्लायव्हील) निर्मिती करत आहोत.”

 

या उपक्रमातील अडथळे दूर करणारे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कमेंट-टू-डीएम ऑटोमेशन: एखादा प्रेक्षक क्रिएटरच्या पोस्टवर “ट्रिप” अशी कमेंट करतो, तेव्हा त्याला त्याच्या डायरेक्ट मेसेजमध्ये (डीएम) प्रत्‍यक्ष बुकिंगची लिंक आणि क्लिअरट्रिपचा एक विशेष कूपन कोड आपोआप मिळतो. हा उपक्रम संपूर्ण भारतात इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर सुरू झाला आहे.

 

या उपक्रमाचे सुरुवातीचे परिणाम अत्यंत उत्साहवर्धक राहिले आहेत. एकूण तयार करण्यात आलेल्या कन्टेंटमध्ये प्रादेशिक क्रिएटर्सचा वाटा ५० टक्‍के आहे, ज्‍यामधून वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रांमधील उत्तम स्थानिक पोहोच दिसून येते. विविध श्रेणींमधील क्रिएटर्सचा सहभाग देखील अपेक्षेपेक्षा जास्त राहिला असून ब्युटी अँड लाइफस्टाइल, फूड आणि डील हॅक कन्टेंट ५ टक्‍के ते ६ टक्‍क्‍यांचा एंगेजमेंट रेट (प्रेक्षकांचा सहभाग) सातत्याने मिळवत आहेत, जो या क्षेत्रातील मापदंडांपेक्षा खूप जास्त आहे. या उपक्रमात दक्षिण भारतातील राज्यांमधून क्रिएटर्सचा मोठा सहभाग पाहायला मिळाला आहे, ज्यामध्ये विशेषतः तेलुगू भाषेतील कन्टेंट सर्वात सक्रिय आणि वेगाने वाढणारा विभाग म्हणून समोर

आला आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments