कावासाकी, जपान – तोशिबा कॉर्पोरेशनने आज ग्रिडडीबी स्टार्ट-अप प्रोग्राम’ सुरू करण्याची घोषणा केली. हा उपक्रम एक धोरणात्मक पुढाकार आहे जो स्टार्ट-अप्सना ग्रिडडीबी क्लाउड’वर रिअल-टाइम इंडस्ट्रियल सोल्यूशन्स तयार करण्यासाठी आणि ते मोठ्या प्रमाणावर विकसित करण्यासाठी सक्षम करेल. यासाठी 24 जून 2026 पासून अर्ज खुले होत आहेत.ग्रिडडीबी क्लाउड हे तोशिबाचे बिग डेटा आणि आयओटी सिस्टम्ससाठीचे एक डिस्ट्रिब्युटेड टाईम-सीरिज डेटाबेस आहे.
माहितीच्या सातत्याने वाढणाऱ्या प्रवाहावर चालणाऱ्या आजच्या व्यावसायिक जगात, डेटाचे मूल्य शोधणे आणि ते मिळवणे यासाठी अशा यंत्रणेची गरज असते जी कोणत्याही अडचणीशिवाय मोठ्या प्रमाणावरील डेटाचे रिअल-टाइममध्ये अचूक आणि विश्वासार्ह विश्लेषण करू शकेल. तोशिबाचे डिस्ट्रिब्युटेड टाईम‑सीरिज डेटाबेस असलेले ग्रिडडीबी, विश्वासार्हता, कमीत कमी विलंब आणि हॉरिझॉन्टल स्केलेबिलिटी या आपल्या वैशिष्ट्यांच्या जोरावर या आव्हानांवर मात करते.
ग्रिडडीबी स्टार्ट-अप प्रोग्राम’चा शुभारंभ हा स्टार्ट-अप्ससोबत दीर्घकालीन भागीदारी वाढवण्याच्या तोशिबाच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे, ज्यायोगे सोल्यूशन्सच्या सह-विकसनाला गती मिळेल आणि नवीन कल्पना प्रत्यक्षात आणता येतील. या प्रोग्रामचे उद्दिष्ट डेटा इन्फ्रास्ट्रक्चरमधील तोशिबाचे नैपुण्य आणि स्टार्ट-अप्सची सर्जनशीलता व चपळता एकत्र आणणे हे आहे. यामुळे आयओटी, एआय व मशीन लर्निंग, स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थकेअर, फायनान्स, रिअल-टाइम ॲनालिटिक्स आणि इतर क्षेत्रांमध्ये नवीन युज केसेस आणि तांत्रिक प्रगती निर्माण करता येईल.
हा प्रोग्राम सहभागींना आवश्यक तंत्रज्ञान प्रदान करतो, नवीन शोधांमधील अडथळे कमी करतो आणि सहकार्यात्मक प्रयोगांना सक्षम करतो. ग्रिडडीबी क्लाउड आणि ग्रिडडीबीच्या तांत्रिक कौशल्याची उपलब्धता झाल्यामुळे, सहभागींना इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थापनाऐवजी पूर्णपणे उत्पादन विकासावर लक्ष केंद्रित करणे आणि संकल्पनांचे वेगाने प्रोटोटाइप तयार करणे, त्यांची पडताळणी करणे व त्यांचा विस्तार करणे शक्य होते. हा प्रोग्राम सुरुवातीच्या काळातील वाढीला चालना देण्यासाठी संसाधने आणि प्रोत्साहने देखील प्रदान करतो, ज्यामुळे स्टार्ट-अप्सना त्यांचे उत्पादन बाजारात आणण्याचा वेग वाढवण्यास आणि त्यांचे सोल्यूशन्स जागतिक स्तरावर नेण्यास मदत होते.
ग्रिडडीबी स्टार्ट-अप प्रोग्रामची प्रमुख प्रोत्साहने:
ग्रिडडीबी क्लाउडचा मोफत ॲक्सेस
ग्रिडडीबीच्या तज्ज्ञांकडून समर्पित तांत्रिक सहाय्य
तोशिबाच्या ग्रिडडीबी टीमसोबत संयुक्त मार्केटिंग आणि प्रमोशनल उपक्रमांच्या संधी
तोशिबा कॉर्पोरेट व्हेंचर कॅपिटलसोबत जोडले जाण्याची संभाव्य संधी
24 जून 2026 पासून, ‘ग्रिडडीबी क्लाउड’ उपलब्ध असलेल्या 26 देश आणि प्रदेशांसाठी अर्ज खुले होत आहेत. सविस्तर माहिती आणि अर्ज येथे उपलब्ध आहे.
ग्रिडडीबी स्टार्ट-अप प्रोग्राम’च्या माध्यमातून विकसित होणाऱ्या सहकार्यातून, तोशिबा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशच्या (डीएक्स) प्रगतीमध्ये आणि भविष्यातील सायबर-फिजिकल सिस्टम्स प्रत्यक्षात आणण्यासाठी आपले योगदान देणे सुरू
च ठेवेल.


