Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedसहकार मंत्रालयाच्या ५ वर्षपूर्तीनिमित्त २९ जून ते ६ जुलै दरम्यान सहकारी सप्ताह

सहकार मंत्रालयाच्या ५ वर्षपूर्तीनिमित्त २९ जून ते ६ जुलै दरम्यान सहकारी सप्ताह

 

पुणे दि. २४ (जिमाका, वृत्तसेवा):भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दि. २९ जून ते ६ जुलै २०२६ या कालावधीत सहकारी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या., पुणे आणि सहकार खाते, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

सहकारातून समृद्धी, सहकारी चळवळीचे राष्ट्रविकासातील योगदान तसेच सहकार मंत्रालयाच्या विविध उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या सप्ताहाचा उद्देश आहे.

 

हा सप्ताह २९ जून रोजी सहकारी सप्ताह शुभारंभ व प्रतिज्ञा दिन, ३० जून रोजी प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था परिवर्तन दिन, १ जुलै रोजी शेतकरी गौरव दिन, २ जुलै रोजी कृत्रिम बुद्धिमत्ता व तंत्रज्ञान दिन, ३ जुलै रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सहकार चर्चासत्र, ४ जुलै रोजी हरित सहकार दिन, ५ जुलै रोजी नवीन पिढी सहकारी दिन तसेच ६ जुलै रोजी राष्ट्रीय सहकार उत्सव दिन उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.

 

सप्ताहादरम्यान डिजिटलायझेशन, शेतकरी मेळावे, धान्य साठवण योजना, एआय तंत्रज्ञान, वृक्षलागवड मोहीम आणि युवकांचा सहकार क्षेत्रातील सहभाग वाढविण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राजेंद्रकुमार दराडे, अपर निबंधक, सहकारी संस्था तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे यांनी दिली.

 

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments