प्रेस – नोट
केशव माधव विश्वस्त निधी तर्फे
मुग्धा आपटे हिचा सत्कार.
पुणे
(प्रतिनिधी)
येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सह्याद्री प्रभात कर्वेनगर शाखेचे ज्येष्ठ स्वयंसेवक बाळकृष्ण काळे यांची नात *मुग्धा मंदार आपटे* ही यंदाच्या बारावी ( कॉमर्स ) परीक्षेत ९१ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली.तिला “Chartered Accountant” व्हायचे आहे.ती CA फाऊंडेशन उत्तीर्ण झाली आहे.या निमित्त तिचा शैक्षणिक साहित्य भेट वस्तू,पुष्पगुच्छ देऊन *केशव माधव विश्वस्त निधी* तर्फे योगशिक्षक सुभाष फडके यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला.
या प्रसंगी नंदकुमार कुलकर्णी,”केशव माधव”चे विश्वस्त प्रकाश देशपांडे,मुग्धा,तिची मोठी बहीण स्वरांगी (सॉफ्टवेअर इंजिनियर),आई सौ सुलक्षा आपटे,बाळकृष्ण काळे,सौ मीरा काळे यांची उपस्थिती होती.


