हरियाणा, मार्च २०२४: क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स लि. या पंप उद्योगामधील नाविन्यपूर्ण सोल्यूशन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या कंपनीला हरियाणा राज्यासाठी प्रतिष्ठित पीएम-कुसुम योजनेअंतर्गत सलग चौथ्यांदा उल्लेखनीय सोलार वॉटर पंपिंग सिस्टम ऑर्डर मिळाल्याची घोषणा करताना अभिमान वाटत आहे. नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभाग हरियाणा आणि एचएआरईडीएने मंजूर केलेल्या नवीन ऑर्डरमध्ये ७.५ एचपी डीसी, १० एचपी एसी व १० एचपी डीसी सोलार फोटोव्होल्टाइक वॉटर पंपिंग सिस्टम्सचा पुरवठा, इन्स्टॉलेशन आणि कार्यसंचालनांचा समावेश आहे, ज्यांची किंमत ९ कोटी रूपयांहून अधिक आहे. हे यश सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एसईसीआय) आणि मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्यूएबल एनर्जी (एमएनआरई) यांच्या नेतृत्वांतर्गत मोठ्या उपक्रमाचा भाग आहे, ज्याचा भारतभरातील ६.५ लाख पंपांसाठी नवीन कनेक्शन्स बदलण्याचा व स्थापित करण्याचा मनसुबा आहे. एचएआरईडीएकडून आतापर्यंतच्या मिळालेल्या एकूण ऑर्डर्सचे मूल्य ६५.६ कोटी रूपये आहे.
तसेच, क्रॉम्प्टनने महाराष्ट्रात २५०० सोलार पंपिंग सिस्टम्ससाठी, ज्यापैकी ५०० सिस्टम्ससाठी एमएसईडीसीएलकडून (महराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. लि.) आणि २००० सिस्टम्ससाठी एमईडीएकडून (महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी) लेटर ऑफ एम्पॅनेलमेंट मिळवले आहे.
फलोत्पादन आयुक्तालय, राजस्थानकडून राजस्थानमधील १००० सोलार पंपिंग सिस्टम्ससाठी आणखी एक लेटर ऑफ एम्पॅनेलमेंट मिळाले आहे.
मिळालेल्या लेटर ऑफ एम्पॅनेलमेंटचे एकूण मूल्य जवळपास ८५ कोटी रूपये आहे, ज्यामुळे कृषी शाश्वततेप्रती त्यांच्या कटिबद्धतेमधील हे आणखी एक पाऊल आहे. हा मोठा विकास, तसेच हरियाणा आणि महाराष्ट्र व राजस्थान सरकारमधील एलओईकडून नुकतेच मिळालेली चौथी ऑर्डर यामधून क्रॉम्प्टनची वाढती उपस्थिती आणि हरित भविष्यासाठी शाश्वत सोल्यूशन प्रदान करण्यासह तंत्रज्ञानाचा फायदा घेण्याप्रती समर्पितता दिसून येते.
भारतातील व्यापक कृषीक्षेत्रात सोलार ऊर्जा शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायी सोल्यूशन आहे. यामुळे ग्रीनहाऊस वायू उत्सर्जन कमी होत पर्यावरणीय समस्यांचा सामना करता येतो, तसेच ऊर्जा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होत त्यांची लाभक्षमता देखील वाढते. देश शाश्वत ऊर्जेला प्राधान्य देत असताना गेम-चेंजर सोलार ऊर्जा आपल्या भूमातेच्या भविष्यासाठी शुद्ध व नवीकरणीय ऊर्जा स्रोत देत आहे. कृषी सारख्या क्षेत्रांमध्ये सोलारचा समावेश व्यावहारिक व इको-फ्रेण्डली दृष्टिकोन तयार करत परिवर्तन घडवून आणेल, ज्याचा शेतकरी व पर्यावरणाला फायदा होईल. म्हणून, क्रॉम्प्टनची शाश्वत सोल्यूशन्सप्रती समर्पितता देशाच्या नवीकरणीय ऊर्जेप्रती पुढाकाराशी संलग्न आहे.
क्रॉम्प्टनचा पुढील काही वर्षांमध्ये ऊर्जा कार्यक्षमता श्रेणीत प्रभाव निर्माण करण्याच्या प्रयत्नांसह पीएम-कुसुम योजनेअंतर्गत १०,००० हून अधिक सोलार पॉवर्ड पंप्स तैनात करण्याचा मनसुबा आहे. व्यापक विक्रीपश्चात्त सेवा नेटवर्क, भारतभरात तंत्रज्ञानदृष्ट्या सुसज्ज चॅनेल भागीदार उपस्थिती, अव्वल आरअँडडी व उत्पादन सुविधा आणि प्रखर ५-टप्प्यांची उत्पादन विकास प्रक्रिया अशा उत्तम सुविधांच्या माध्यमातून क्रॉम्प्टन उच्च ऊर्जा-कार्यक्षम व नाविन्यपूर्ण सोलार वॉटर पंपांची व्यापक श्रेणी तैनात करण्याचे लक्ष्य संपादित करू शकते.
याप्रसंगी आपले मत व्यक्त करत क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स लि. येथील पंप्स विभागाचे उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख रजत चोप्रा म्हणाले, ”आम्हाला पीएम-कुसुम योजनेअंतर्गत हरियाणामध्ये सोलार पंपिंग सिस्टम्ससाठी सलग चौथी ऑर्डर, तसेच महाराष्ट्र व राजस्थान सरकारकडून लेटर ऑफ एम्पॅनेलमेंट संपादित करण्याचा आनंद होत आहे. यामुळे कृषीक्षेत्राला अत्याधुनिक व शाश्वत सोल्यूशन्स प्रदान करण्याप्रती आमची समर्पितता अधिक दृढ झाली आहे. क्रॉम्प्टनमध्ये आमचा विश्वास आहे की नाविन्यता हा आमच्या डीएनएचा भाग आहे, जो आम्हाला सतत मर्यादांना दूर करण्यास प्रेरित करत आहे. सोलार वॉटर पंप श्रेणीमधील आमचे यश आमच्या उपस्थितीला अधिक दृढ करते, जेथे आम्ही उद्योगामध्ये प्रगत व शाश्वत सोल्यूशन्स आणण्याचा सतत प्रयत्न करतो. आम्हाला कृषी कार्यक्षमता व आर्थिक समृद्धतेची खात्री घेण्यामध्ये पंप बजावणाऱ्या भूमिकेबाबत माहित आहे. म्हणून, आम्हाला शेतकऱ्यांना विश्वसनीय सोलार-पॉवर्ड सिंचन सोल्यूशन्ससह सक्षम करत हरियाणाच्या शाश्वत विकास ध्येयांप्रती योगदान देण्याचा अभिमान वाटतो. आमचा विश्वास आहे की, हा सहयोग राज्यातील कृषीक्षेत्राला उज्ज्वल भविष्याच्या दिशेने घेऊन जाईल.”
क्रॉम्प्टनने हरियाणा, महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्यप्रदेश या चार राज्यांसाठी निविदा प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला होता. एसईसीआय व एमएनआरई यांच्या देखरेखीअंतर्गत सुरूवातीचे ग्राउंडवर्क अंतिम अंमलबजावणी टप्प्यासाठी संबंधित राज्य नोडल एजन्सी – एचएआरईडीए (हरियाणा), एमईडीए, एमएसईडीसीएल (महाराष्ट्र), एमपीयूव्हीएनएल (मध्यप्रदेश) आणि आरएचडीएस, आरयूव्हीव्हीएनएल (राजस्थान) यांच्याकडे हस्तांतरित झाले आहे. क्रॉम्प्टन वर्क ऑर्डरसह एचएआरईडीएसोबत आपले कार्यसंचालन सुरू करण्यासाठी सज्ज आहे, तसेच राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी तितकेच तयार आहेत.
क्रॉम्प्टन विषयी:
८५ वर्षांहून प्रदीर्घ असा ब्रॅण्डचा वारसा लाभलेली क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ही फॅन्स (पंखे) व निवासी पंपांच्या विभागातील भारतीय बाजारपेठेतील आघाडीची कंपनी आहे. गेल्या अनेक वर्षांत कंपनीने आधुनिक ग्राहकाच्या गरजा पूर्ण करणारी अनेकविध नाविन्यपूर्ण उत्पादने देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. यामध्ये श्रेष्ठ दर्जाचे व उच्च कामगिरी करणारे वॉटर हिटर्स, एअर कूलर्स, मिक्सर ग्राइंडर्स सारखे लहान किचन अप्लायन्सेस, एअर फ्रायर्स, ओटीजी, इलेक्ट्रिक केट्ल्स, इस्त्रीसारखी इतर होम अप्लायन्सेस आणि बिल्ट-इन किचन अप्लायन्सेस यांच्या अनेकविध श्रेणींचा समावेश होतो. कंपनीने ब्रॅण्ड आणि नाविन्यपूर्ण संशोधनामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. यामुळे ग्राहकांच्या गरजा अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येतात व पूर्ण करतात येतातच, शिवाय ऊर्जा कार्यक्षमतेलाही चालना देण्यात मदत होते. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या व्यवसायाला आवश्यक असे सुस्थापित आणि संघटित वितरण नेटवर्कही कंपनीने विकसित केले आहे. देशभरातील भक्कम डीलरबेसद्वारे ग्राहकांना उत्तम सेवा पुरवली जाते तसेच विक्री-पश्चात्त सेवाही कार्यक्षमतेने दिल्या जातात.
ऊर्जा-कार्यक्षम उत्पादनांचा विकास करण्याप्रती कंपनीच्या सातत्यपूर्ण समर्पिततेमुळे अनेक मान्यता व पुरस्कार मिळाले आहेत. कंपनीला ऊर्जा मंत्रालयाच्या बीईईद्वारे तीन प्रतिष्ठेची नॅशनल एनर्जी कंझ्युमर अवॉर्डस् (एनईसीए) प्राप्त झाले आहेत. २०२३ मध्ये भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराने कंपनीच्या स्टोरेज वॉटर हीटरला मान्यता दिली. २०१९ मध्ये, ब्रॅण्डने दोन श्रेणींमध्ये यश मिळवले: सीलिंग फॅन आणि एलईडी बल्ब. याव्यतिरिक्त, डेलॉइट प्रायव्हेटने कंपनीला इंडियाज बेस्ट मॅनेज्ड कंपनीज २०२२ म्हणून मान्यता दिली आणि डन अॅण्ड ब्रॅडस्ट्रीट इंडियाने ‘इंडियाज टॉप ५०० कंपनीज २०२२’मध्ये सूचीबद्ध केले. डब्ल्यूपीपी आणि कंतार यांनी २०२० साली प्रसिद्ध केलेल्या आघाडीच्या सर्वांत मौल्यवान ७५ भारतीय ब्रॅण्ड्सच्या यादीतही कंपनीला स्थान देण्यात आले. याशिवाय हेराल्ड ग्लोबल आणि बीएआरसी आशिया यांनी ग्राहकोपयोगी इलेक्ट्रिकलच्या विभागात क्रॉम्प्टनला ब्रॅण्ड ऑफ द डिकेड २०२१ म्हणून मान्यता दिली.


