Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedआकाशवाणी पुणे केंद्रावर 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' विषयावर विशेष मुलाखत...

आकाशवाणी पुणे केंद्रावर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ विषयावर विशेष मुलाखत प्रसारित*

 

पुणे, दि. ३ : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ या विषयावर आधारित विशेष मुलाखतीचे प्रसारण शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.१० ते १०.२५ या वेळेत आकाशवाणी पुणे ‘अ’ केंद्रावर होणार आहे.

या विशेष मुलाखतीत सहकारी संस्था पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश लक्ष्मण जगताप हे योजनेची उद्दिष्टे, पात्रता, लाभार्थी निवडीची प्रक्रिया, कर्जमाफीच्या अंमलबजावणीचे विविध टप्पे तसेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभांविषयी सविस्तर माहिती देणार आहेत.

मुलाखतीचे सूत्रसंचालन व प्रश्नोत्तरांचे संचालन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटीलयांनी केले आहे. संवादात्मक स्वरूपातील या कार्यक्रमातून शेतकरी, सहकारी संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील विविध शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

शेतकरी बांधवांनी या योजनेची अधिकृत, अचूक आणि विश्वासार्ह माहिती जाणून घेण्यासाठी शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.१० वाजता ते १०.२५ वाजता या वेळेत आकाशवाणी पुणे ‘अ’ केंद्रावरील हा विशेष कार्यक्रम आवर्जून ऐकावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments