Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedगोसेवा व गोसंवर्धनासाठी कार्यरत गोशाळांना आर्थिक मदत ग्रंथ पारायण दिंडी आणि गीता...

गोसेवा व गोसंवर्धनासाठी कार्यरत गोशाळांना आर्थिक मदत ग्रंथ पारायण दिंडी आणि गीता धर्म मंडळ यांच्या वतीने मराठीत प्रथमच गोकथेचे आयोजन

पुणे : ग्रंथ पारायण दिंडी आणि गीताधर्म मंडळ यांच्या वतीने गोसेवा आणि गोसंवर्धनाचे कार्य निष्ठेने करणाऱ्या गोशाळा संचालकांचा सन्मान करत विविध गोशाळांना आर्थिक मदत व देणग्या देण्यात आल्या.

 

सदाशिव पेठेतील गीता धर्म मंडळात प्रथमच मराठीत आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय गो कथा महोत्सवात ही मदत देण्यात आली. या गो कथेचे निरूपण ह.भ.प. परेश बुवा देवळणकर यांनी केले.

 

परेश बुवा देवळणकर म्हणाले, दुभती असताना गायीची सेवा अनेकदा दुधाच्या अपेक्षेने केली जाते. मात्र, भाकड गाईची सेवा करताना कोणताही आर्थिक लाभ मनात नसतो. त्यामुळे अशा निस्वार्थी सेवेचे पुण्य प्राप्त होते. भाकड गायीची सेवा केल्याने गोमातेबद्दलचा कृतज्ञतेचा भाव अधिक दृढ होतो.

 

ते पुढे म्हणाले, गोशाळेत जाऊन प्रत्यक्ष सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भाकड गाईला कत्तलखान्यात जाण्यापासून वाचविणे हे अत्यंत पुण्याचे कार्य मानले गेले असून, अशा सेवेचे फळ एका अश्वमेध यज्ञाइतके असल्याचे शास्त्रात सांगितले आहे.

 

महोत्सवात गोशाळांचे व्यवस्थापन व गो सेवेचे कार्य निष्ठेने चालविणाऱ्या गोशाळा संचालकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये स्वामी कृष्ण गोशाळा, खानापूर; गोमई गोशाळा, साधना आश्रम, गिवशी; मधुकर घुले यांची गोशाळा, कुळे (पौड-कोळवण रस्ता); पुनम राऊत यांची गोशाळा, पारगाव-खंडाळा तसेच धनकवडी लिमये यांची गोशाळा यांचा समावेश होता.

 

आयोजक वीरेंद्र कुंटे म्हणाले, भारतीय संस्कृतीत गोमातेला अत्यंत पूजनीय स्थान आहे. गोसेवा, गोसंवर्धन आणि गोदान या विषयांबाबत समाजात जनजागृती व्हावी, तसेच भाविकांमध्ये गोभक्तीची भावना दृढ व्हावी, या उद्देशाने प्रथमच मराठीत गोकथेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मिळाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments