Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedज्येष्ठ पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी अहिल्यानगर येथे ज्येष्ठ पत्रकार फेडरेशन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र...

ज्येष्ठ पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी अहिल्यानगर येथे ज्येष्ठ पत्रकार फेडरेशन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र शाखा कार्यकारिणीची बैठक.

 

 

पुणे ३.जुलै.-

ज्येष्ठ पत्रकार फेडरेशन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र शाखा कार्यकारिणीची बैठक आणि अहिल्यानगर येथील ज्येष्ठ पत्रकारांच्या समस्या जाणून

घेण्यासाठी पाच जुलै रोजी अहिल्यानगर येथे होणार आहे. फेडरेशनचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर जयपाल पाटील हे उपस्थित राहणार आहेत. राज्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकार तसेच कार्यकारणी सदस्य उपस्थित राहणार आहेत.

देशभरातील जेष्ठ पत्रकारांच्या पेन्शन व आरोग्य योजना सामाजिक सुरक्षाआणि अनेकविध मागण्यांचा प्रभावी पाठपुरावा तसेच ज्येष्ठ पत्रकारांच्या अनेकविध समस्या सोडविण्यासाठी याची स्थापना राष्ट्र पातळीवर करण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय ज्येष्ठ पत्रकार फेडरेशनच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने

अहिल्यानगर येथील सावेडी रोडवरील माऊली संकुल सभागृहात रविवार दिनांक 5 जुलै रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत होणाऱ्या या बैठकीस अहिल्यानगर आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सरचिटणीस संजय जोशी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments