Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedहोंडाकडून जपानमध्ये WR-V म्हणून मेड इन इंडिया एसयूव्ही एलिव्हेट लाँच ...

होंडाकडून जपानमध्ये WR-V म्हणून मेड इन इंडिया एसयूव्ही एलिव्हेट लाँच कंपनीच्या जागतिक व्यवसाय धोरणातील प्रमुख निर्यात केंद्र बनण्यासाठी होंडाचा भारतातील कार्य संचालनामधील महत्त्वपूर्ण टप्पा

नवी दिल्ली, २२ मार्च, २०२४: होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातील प्रिमियम कारच्या आघाडीच्या उत्पादक कंपनीने आज ऐतिहासिक महत्त्वपूर्ण टप्पा साजरा केला, जेथे कंपनीने जपानी बाजारपेठेत WR-V या ब्रँड नावाने मेड इन इंडिया होंडा एलिव्हेट लाँच केली आहे.

एचसीआयएलच्या व्यवसायात पहिल्यांदाच भारतातून जपानमध्ये मॉडेलची निर्यात केली जात आहे, जी भारताच्या ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी मोठी झेप असून देशाच्या वाढत्या उत्पादन कौशल्य आणि जागतिक स्पर्धात्मकतेला प्रकाशझोतात आणते.

भारतातून जपानमध्ये एलिव्हेट निर्यात करण्याचा होंडाचा निर्णय कंपनीचा तिच्या भारतातील कार्य संचालनामधून जगभरातील ग्राहकांना उच्च दर्जाची उत्पादने देण्याचा विश्वास सार्थ ठरवतो.

या प्रसंगी बोलताना, होंडा कार्स इंडिया लि.चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ताकुया त्सुमुरा म्हणाले, “जपानमध्ये WR-V म्हणून ‘मेड-इन-इंडिया’ एलिव्हेट लाँच करणे हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. हे होंडाच्या जागतिक व्यावसायिक धोरणांमध्ये होंडा कार्स इंडियाच्या आमच्या उत्पादन क्षमतेची आणि वाढत्या महत्त्वाची पुष्टी करते. ऑल-न्यू होंडा एलिव्हेटचे भारतातील बाजारपेठेत कौतुक करण्यात आले आहे आणि ती आमच्या व्यवसायाचा प्रमुख आधारस्तंभ बनली आहे. आम्हाला खात्री आहे की, आम्ही या यशाची पुनरावृत्ती करू आणि आमच्या जागतिक ग्राहकांचे सर्वोत्तम दर्जा आणि कामगिरीसह समाधान करू.”

एलिव्हेटने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मॉडेल लाँच करणारी पहिली बाजारपेठ म्हणून भारतासोबत जागतिक स्तरावर पदार्पण केले आणि गेल्या ६ महिन्यांत ३०,००० हून अधिक युनिट्सची विक्री केली.

हे मॉडेल जपानमध्ये होंडा WR-V या नावाने डिसेंबर २३ मध्ये अनावरण करण्यात आले होते आणि तिला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे, ज्यांना रस्त्यावर मजबूत उपस्थिती, उत्कृष्ट जागा आणि आराम, प्रगत सुरक्षा ऑफर आणि सुव्यवस्थित वैशिष्ट्यांनी युक्त एसयूव्ही डिझाइन आवडते.

एचसीआयएल तुर्की, मेक्सिको आणि मध्यपूर्वेतील लेफ्ट हँड ड्राइव्ह मार्केटमध्ये आणि नेपाळ, भूतान, दक्षिण आफ्रिका आणि एसएडीसी देशांमध्ये अशा उजव्या हाताच्या ड्राइव्ह मार्केटमध्ये मॉडेल्सची निर्यात करत आहे. होंडा एलिव्हेटची जपानला होणारी निर्यात ही भारतातून निर्यात व्यवसायातील सर्वात नवीन भर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments