Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedजुन्या दिवसांना परत मिळणार उजाळा, ये मेरी फॅमिलीचा तिसरा सीझन लवकरच अॅमेझॉन...

जुन्या दिवसांना परत मिळणार उजाळा, ये मेरी फॅमिलीचा तिसरा सीझन लवकरच अॅमेझॉन मिनीटीव्हीवर ये मेरी फॅमिलीचा नवा सीझन लवकरच येणार असून तो अॅमेझॉन शॉपिंग अ‍ॅपमधील अॅमेझॉन मिनीटीव्हीवर, फायर टीव्ही आणि प्ले स्टोअरवर मोफत पाहता येणार

मुंबई, 22 मार्च 2024 – अॅमेझॉन मिनीटीव्ही- अॅमेझॉनची मोफत व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा बहुप्रतीक्षीत कौटुंबिक शो ‘ये मेरी फॅमिली’चा तिसरा सीझन लाँच करण्यासाठी सज्ज आहे. अॅमेझॉन मिनीटीव्हीने या शोच्या नव्या सीझनमध्ये सर्वांचे लाडके अवस्थी परिवार परत आणण्याचे ठरवले असून त्यात हेतल गाडा, अंगद राज, राजेश कुमार आणि जुही परमार यांचा समावेश आहे. तिसरा सीझन प्रेक्षकांना ऋषी नावाच्या 11 वर्षांच्या, मोठी स्वप्नं पाहाणाऱ्या आणि तितकंच मोठं मन असणाऱ्या खट्याळ मुलाच्या नजरेतून भावनिक सफरीवर घेऊन जाईल. जुन्या आठवणींना उजाळा देताना हा शो जुन्या काळातल्या कुटुंबपद्धतीची जादू पुन्हा अनुभवायला देईल. टीव्हीएफ प्रॉडक्शन असलेली ये मेरी फॅमिली केवळ अॅमेझॉन मिनीटीव्हीवर आणि मोफत पाहायला मिळेल.
1995 च्या काळात घडणारी गोष्ट दाखवणाऱ्या ये मेरी फॅमिलीच्या तिसऱ्या सीझनमध्ये कुटुंबातल्या वेगवेगळया भावना नाजूकपणे दाखवत जुने साधे दिवस आणि अतूट नाती यांना उजाळा देण्यात येणार आहे. जीवनातल्या गुंतागुंतीला तोंड देताना अवस्थी परिवारातला प्रत्येक क्षण नात्यांची ऊब, हास्य आणि जुन्या रम्य आठवणींचा मिलाफ घेऊन येणारा आहे. गजबजलेल्या रस्त्यांपासून घरातल्या आरामदायी कोपऱ्यापर्यंत, शाहरूख आणि सलमानचं वर्चस्व असलेल्या बॉलिवुडपर्यंत आणि सचिननं मारलेल्या शतकानंतर भारावलेल्या देशापर्यंत बरंच काही या शोच्या निमित्ताने परत अनुभवता येणार आहे. प्रेक्षकांसाठी हृदयस्पर्शी पर्वणी घेऊन येणारा हा शो त्यांना अशा काळात घेऊन जाईल, जेव्हा मारूती 800 श्रीमंतीचं प्रतीक मानलं जायचं आणि घरच्यांबरोबर किंवा मित्रांबरोबर घालवलेली प्रत्येक संध्याकाळ अविस्मरणीय असायची.
अॅमेझॉन मिनीटीव्हीचे कंटेट प्रमुख अमोघ दुसाद म्हणाले, ‘अॅमेझॉन मिनीटीव्हीला ये मेरी फॅमिलीचा तिसरा सीझन लवकरच येत असल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. हे कौटुंबिक नाट्य प्रेक्षकांच्या मनात वसलेले असून त्यातल्या व्यक्तीरेखा आणि आपलंसं वाटणारं कथानक प्रेक्षकांना परत जुन्या काळात घेऊन जाईल.’
तिसरा सीझन परत येत असल्याविषयी जुही परमार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, ‘प्रेक्षकांकडून नीरजाला खूप प्रेम मिळालं. अशाप्रकारची आपलीशी वाटणारी मजेदार व्यक्तीरेखा साकारताना मलाही खूप आनंद वाटतो. ये मेरी फॅमिलीच्या तिसऱ्या सीझनसाठी मी खूप उत्सुक आहे, कारण त्यात मूळ संकल्पना आणि मनोरंजन कायम ठेवण्यात आलं आहे. आपल्या प्रत्येकालाच जुन्या आठवणींत रमून जायला आवडतं आणि ये मेरी फॅमिली तसाच, जुन्या, सोप्या आयुष्याची आठवण करून देणारा आहे. नीरजाविषयी सांगायचं झालं, तर ती शिस्त आणि प्रेम एकत्र नांदू शकतात याची आठवण करून देत जीवनाचा समतोल साधणारी आहे.’
‘ये मेरी फॅमिलीचा तिसरा सीझन आणताना मी जुन्या आठवणींनी भारावून गेलो आहे. संजयची व्यक्तीरेखा खूपशी माझ्यासारखी आहे, कारण तो तत्वांना घट्ट धरून राहाण्याच्या आपल्या स्वभावाचं प्रतीक आहे. त्याच्यासारखी बहुगुणी व्यक्तीरेखा साकारणं आनंददायी आणि तितकंच आव्हानात्मक आहे. या रम्य प्रवासात प्रेक्षकांना सामावून घेत सोबत हसण्या- रडण्यासाठी आणि कुटुंब व नात्यांची जादू परत नव्यानं शोधण्यासाठी मी उत्सुक आहे,’ असे राजेश कुमार तिसरा सीझन परत येत असल्याचा आनंद व्यक्त करताना म्हणाले.
भारतातील 90 च्या दशकाच्या अविस्मरणीय काळाची जादू ये मेरी फॅमिलीच्या तिसऱ्या सीझनमधून परत अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. द व्हायरल फीव्हर यांची निर्मिती असलेली ही सीरीज केवळ अॅमेझॉन शॉपिंग अ‍ॅपमधील मिनीटीव्ही, फायर स्टिक आणि प्लेस्टोअरवर मोफत पाहाता येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments