Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे मनपाच्या सुरक्षा कर्मचारी यांच्या नियुक्ती बाबत दबाव , कारवाई करा, माजी...

पुणे मनपाच्या सुरक्षा कर्मचारी यांच्या नियुक्ती बाबत दबाव , कारवाई करा, माजी नगरसेवकांची मागणी

पुणे महानगरपालिकेच्या निर्वाचित नगरसेवकांनी सुरक्षेविषयी व्यक्त केलेली चिंता समर्थनीय आहे.
माननीय महापौर या तर फार पोटतिडकीने आणि मनापासून बोलत होत्या.
सुरक्षा कर्मचारी टेंडर मध्ये खूप घोळ, गोंधळ आणि आवडीच्या ठेकेदाराला बसवण्यासाठी खूप कसरती चालू असतात झाले आहेत प्रशासन आणि पुणेकर हे बघत आहे.
काम मुंबई आणि बिल पुण्यामध्ये असाही एक ठेकेदार होता आता तो आहे का नाही माहिती नाही पण दंड केले नाही ती रक्कम फक्त वसूल करून मोकळीक दिली “क्लीनचिट”.
तुम्हाला मोकळीक दिली तर पोलीस दलासारखे सक्षम सुरक्षा रक्षक तुम्ही निर्माण करू शकणार हा जो वादा, दावा तुम्ही मुख्य सभेमध्ये केला त्याचे आम्ही स्वागत करतो आणि या सुरक्षा रक्षक भरतीसाठी कोणकोण दबाव आणतं, का आणतं आणि तो दबाव प्रशासन का सहन करत या प्रश्नाचे उत्तर आता म्हणून आम्हाला मिळणे आवश्यक आहे.
एका कर्मचाऱ्यांनी आपणावर दबाव आणला त्याला आपण बडतर्फ केले ते योग्यच होते तसेच प्रत्येक बदलीच्या ऑर्डरमध्ये प्रशासनाच्या वतीने हे लिहिलेले असते की राजकीय दबाव आणला तर शिस्तभंगाची कारवाई करू.
यातून ठेकेदारांना वगळण्याचे काय कारण आहे ?
आमची आपणाकडे मागणी आहे जो काही राजकीय, प्रशासकीय दबाव असेल तो तुम्हाला जाहीर करायचा नसला तरी तो दूर करा आणि सुरक्षा रक्षक हे सक्षम बनवा पुणे महानगरपालिकेच्या प्रतिमेवर याचा परिणाम होतो ही बाब गंभीर आहे.
आपण एक निपक्ष कार्यक्षम आणि शहराचा हिताचा विचार करणारे आयुक्त म्हणून आम्ही आपणाकडे बघतो आपण या संदर्भामध्ये तातडीने पावले उचलून दबाव आणणाऱ्यांची नावे दबावामुळे नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता आणि पोलीस दलासारखे कार्यक्षम सुरक्षारक्षक तयार करणे याला प्राधान्य देऊन त्याप्रमाणे कृती करावी अशी मागणी माजी नगरसेवक उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.या पत्राच्या प्रती संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments