Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedसायबर पाठलाग प्रतिबंध विषयावरील क्षमता बांधणी कार्यक्रमाचे २३ जुलै रोजी आयोजन*

सायबर पाठलाग प्रतिबंध विषयावरील क्षमता बांधणी कार्यक्रमाचे २३ जुलै रोजी आयोजन*

*सायबर पाठलाग प्रतिबंध विषयावरील क्षमता बांधणी कार्यक्रमाचे २३ जुलै रोजी आयोजन*

पुणे, दि. २१ (जिमाका, वृत्तसेवा) : राष्ट्रीय महिला आयोग, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाठलाग आणि सायबर पाठलाग प्रतिबंध’ या विषयावर एक दिवसीय क्षमता बांधणी कार्यक्रमाचे यशदा पुणे येथे २३ जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर प्रमुख अतिथी म्हणून तसेच अपर पोलीस महासंचालक (महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग) अश्वती दोर्जे, अपर पोलीस महासंचालक (सायबर विभाग) यशस्वी यादव आणि ग्लोबल केअर फाउंडेशन, दुबईचे रिझावान शेख उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

डिजिटल माध्यमांचा वाढता वापर आणि त्यासोबत महिलांविरुद्ध वाढणारे सायबर गुन्हे लक्षात घेता पाठलाग व सायबर पाठलाग या गंभीर समस्यांबाबत जनजागृती करणे, प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देणे आणि संबंधित यंत्रणांची क्षमता वाढविणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमात पुण्यातील विधी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी केले आहे.

यावेळी महिला व बाल विकास आयुक्तालय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत, असेही कळविण्यात आले आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments