Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedविद्यार्थ्यांना मोदी सरकारची अमानुष मारहाण* *काँग्रेस पक्षाकडून तीव्र संताप व्यक्त*

विद्यार्थ्यांना मोदी सरकारची अमानुष मारहाण* *काँग्रेस पक्षाकडून तीव्र संताप व्यक्त*

नवी दिल्ली येथे ज्येष्ठ पर्यावरणवादी शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली नीट परीक्षा पेपरफुटी संदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सुमारे तीन आठवडे शांततामय आंदोलान करणाऱ्या लाखो तरुण विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी या विद्यार्थ्यांवर केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने अश्रूधूर आणि लाठीहल्ला करून जी क्रूरता दाखवली त्याचा पुणे शहर कॉंग्रेस पक्षातर्फे तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शांततामय आंदोलन करण्याचा अधिकार राज्यघटनेनुसार अधिकार दिला आहे. त्यानुसार अहिंसक मार्गाने नवी दिल्लीयेथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवणे हे मोदी सरकारचे कर्तव्य होते. मात्र त्याऐवजी अकार्यशम शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी मोदी सरकारने राक्षशी पोलीस बळाचा वापर करून विद्यर्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. ही क्रौर्याची परिसीमा आहे. तरुणांच्या आक्रोक्षाला प्रतिसाद देऊन मोदी सरकार मधील अकार्यशम शिक्षण मंत्र्याला हाकलून देण्याऐवजी या तरुण विध्यार्थ्यांना जी अमानुष वागणूक दिली त्यामुळे अमानुष दडपशाहीची व क्रौर्याची परिसीमा गाठली गेली असे म्हणावे लागेल. देशातील तरुण आणि जनतेनेपासून नाळ तुटलेल्या भाजप सरकारची अकार्यक्षम, अपयशी आणि आता क्रूर ही प्रतिमा सर्वांसमोर येत आहे. देशाचे उद्याचे भविष्य असणाऱ्या कोट्यावधी तरुणांना चांगले शिक्षण, आरोग्य व रोजगार देण्याऐवजी आंदोलक तरुण विद्यार्थ्यांना झोडपून काढणाऱ्या क्रूरकर्म मोदी सरकारच्या तरुणांच्या विरोधी अशा कृतीला काँग्रेस पक्ष सैदेव विरोध करत राहील. आता जनतेने आणि विशेषतः तरुण विद्यार्थ्यांनी मोदी सरकारचा हा खरा चेहरा ओळखावा असे पुणे शहर कॉंग्रेस पक्षाच्या पश्चिम विभाग अध्यक्षा दीप्ती चवधरी यांनी पत्रकात म्हंटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments