पुणे,२१ जुलै २०२६ : फीटल मेडिसिन क्षेत्रात उल्लेखनीय यश दर्शवत पुण्यातील नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर येथील डॉक्टरांच्या टीमने अत्यंत दुर्मिळ व जोखमीच्या गर्भातील जुळ्या बाळांवर फीटल थेरपी मायक्रोवेव्ह ॲब्लेजन ही आधुनिक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. या प्रक्रियेद्वारे मोनोकोरियोनिक ट्वीन प्रेगनेंन्सी (एकाच नाळेला – प्लासेंटाला जोडलेली जुळी गर्भावस्था) या गुंतागुंतीच्या स्थितीवर यशस्वीरित्या उपचार करून निरोगी बाळाच्या जगण्याची शक्यता लक्षणीयरित्या वाढली आहे.
ही प्रक्रिया नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर येथील फीटल मेडिसिन तज्ञ कन्सल्टंट डॉ.तेजस ताम्हाणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.त्याचबरोबर टीममध्ये वरिष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ. संतोष सिदीड,बहुशाखीय टीममध्ये डॉ.पंकज गोयल,डॉ.आदिती अबनावे,डॉ.नेहा कोल्हे,भूलतज्ञ व परिचारिकांचा समावेश होता.
या गर्भधारणेमध्ये ही जुळी एकाच नाळेला जोडली गेली होती.या स्थितीला मोनोकोरियोनिक ट्वीन प्रेगनेंन्सी असे म्हणतात. त्यापैकी एका बाळाला डोके अणि हृदय हे मुख्य अवयव तयार झाले नव्हते तर दुसर्या बाळाचे सर्व अवयव व्यवस्थित तयार झाले होते. अशा प्रकारच्या जुळ्या गर्भावस्थेला अकार्डीयाक ट्वीन किवा टीआरएपी सिक्वेन्स असे शास्त्रीय भाषेत मध्ये म्हटले जाते. सदर रुग्ण गर्भावस्थेतील बाराव्या आठवड्यात डॉ. तेजस ताम्हाणे यांच्याकडे सेकंड ओपिनियनसाठी सोनोग्राफीसाठी आल्या होत्या.त्यावेळी अल्ट्रासाऊंड चाचणीमध्ये या गर्भधारणेत ट्वीन रिव्हर्स आर्टेरिअल परफ्युजन (टीआरएपी) सिक्वेंस हीअत्यंत दुर्मिळ परिस्थिती असल्याचे निदान त्यांनी केले .साधारणत: 35000 गर्भावस्थांमध्ये केवळ एका महिलेमध्ये ही स्थिती उद्भवण्याची शक्यता असते.
टीआरएपी सिक्वेंस या स्थितीत जुळ्यांमधील एकामध्ये कार्यरत हृदय आणि मेंदू विकसित होत नाही,याला अकार्डियाक ट्वीन असे म्हणतात.पोटातील दुसऱ्या अर्भका (पंप ट्वीन) कडून मिळत असलेल्या रक्तपुरवठ्यामुळे असामान्य अर्भक म्हणजे अकार्डियाक ट्वीन हे जिवंत राहते.मात्र यामुळे निरोगी अर्भकाच्या हृदयावर प्रचंड ताण येऊ शकतो व हृदय निकामी होणे, बाळा भोवती अतिरिक्त पाणी तयार होणे, मुदतपूर्व प्रसूती किंवा उपचार न केल्यास दोन्ही बाळांचा जीव जाण्याची शक्यता असते.
याबाबत माहिती देताना नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे फीटल मेडिसिन तज्ञ डॉ.तेजस ताम्हाणे म्हणाले की, पुण्यातील एक 32 वर्षीय महिला अल्ट्रासाउंड चाचणीनंतर सेकंड ओपिनियन घ्यायला आमच्याकडे आली.या स्कॅनमध्ये या दुर्मिळ गुंतागुंतीचे निदान झाले. या दाम्पत्याला आधी वाटले होते की,गर्भपात हाच एक पर्याय असू शकतो,मात्र या स्थितीबाबत त्यांच्याशी सखोल संवाद आम्ही साधला आणि त्यांना आधुनिक फीटल थेरपी प्रक्रियांबाबत माहिती दिली.त्यानंतर त्यांनी उपचाराबाबत पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
रूग्णावर 12 व 16 व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड चाचण्या करण्यात आल्या.यामध्ये असामान्य अर्भकाकडे रक्तपुरवठा चालू असल्याची पुष्टी झाली आणि यामुळे निरोगी अर्भकाला जोखीम निर्माण होत आहे,हे स्पष्ट झाले.कधीकधी हा रक्तपुरवठा आपोआप खंडित होऊ शकतो ,म्हणूनच कुठलीही प्रक्रिया करण्याआधी सखोल निदान करण्यात आले.
फीटल थेरपी प्रक्रियेआधी डॉ.ताम्हाणे आणि त्यांच्या टीमने निरोगी बाळाची ॲम्नीयोसेंटेसिस ही चाचणी केली,ज्यामध्ये थोड्या प्रमाणात निरोगी बाळा भोवती चे द्रव्य गोळा करून अनुवंशिक विकार आणि गुणसुत्रांमधील दोष याचे निदान करण्यासाठी पाठवले.चाचणीच्या निकालांमध्ये निरोगी अर्भकामध्ये कुठलाही अनुवंशिक दोष नसल्याचे निदान झाले आणि त्यानंतर मायक्रोवेव्ह ॲब्लेजन या पर्यायासह आधुनिक फीटल प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या प्रक्रियेदरम्यान उच्च रेझोल्युशन अल्ट्रासाऊंडच्या मदतीने मातेच्या पोटातून गर्भाशयात एक विशेष सुईसारख्या उपकरणाचा वापर करण्यात आला.मायक्रोवेव्ह ॲब्लेजनचे उपकरण असामान्य अर्भकामध्ये अचूक बसविण्यात आले.जिथे नियंत्रित इलेक्ट्रोमॅग्नेटिक उर्जेद्वारे व विशिष्ट भागापुरती मर्यादित उष्णता निर्माण करून असामान्य अर्भकाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या कायम स्वरूपी बंद करण्यात आल्या.त्यामुळे असामान्य अर्भकाचा रक्तपुरवठा थांबला आणि निरोगी अर्भकाच्या हृदयावरील अतिरिक्त ताण कमी झाला.
प्रक्रियेनंतरच्या अल्ट्रसाऊंडमध्ये असामान्य अर्भकाला होणारा रक्तपुरवठा संपूर्णपणे थांबल्याचे निदान झाले आणि यामुळे कुठलीही गुंतागुंत झाली नाही.प्रसूतीपूर्व या महिला दर आठवड्याला फॉलोअप स्कॅन्स व देखरेखीसाठी येत राहतील.
डॉ. तेजस ताम्हाणे म्हणाले की,फीटल मेडिसिन आणि फीटल थेरपी या क्षेत्राने एकेकाळी असाध्य समजल्या जाणाऱ्या अनेक गुंतागुंतीच्या गर्भधारणांच्या बाबतीत असलेला दृष्टीकोन बदलून टाकला आहे. या प्रक्रियांमधील वैशिष्टय म्हणजे बाळ हे आईच्या पोटात असतानाच त्यावर योग्य उपचार केले जाऊ शकतात.या प्रक्रियांसाठी विशेष कौशल्य,आधुनिक इमेजिंग तंत्रज्ञान आणि विविध विभागांमधील समन्वय हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
डॉ.ताम्हाणे म्हणाले की,टीआरएपी सीक्वेन्स या स्थितीत मायक्रोवेव्ह ॲब्लेजन हे आधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेली बहुधा पुणे शहरातील ही पहिलीच प्रक्रिया असू शकते. जागतिक दर्जाचे गर्भावस्था मधील अर्भकाचे निदान व उपचार हे पुण्यातच आता उपलब्ध असून अशा प्रकारच्या उपचारांसाठी मोठ्या मेट्रो शहरांमध्ये जाण्याची गरज नाही,हे यातून दिसून येते.
नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे उपव्यवस्थाकीय संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की,ही यशस्वी कामगिरी आमच्या फीटल मेडिसिन टीमचे कौशल्य आणि त्याला असलेला बहुशाखीय दृष्टीकोन आणि जागतिक दर्जाच्या सुविधांचा भक्कम पाठिंबा दर्शवतो.
या अतिशय आव्हानात्मक प्रवासात डॉक्टरांच्या सल्ल्यावर विश्वास ठेवल्याबद्दल उपचार करणाऱ्या टीमने रुग्ण व त्यांच्या कुटुंबाचे आभार मानले.


