Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedसामाजिक बांधिलकी जपत नादब्रह्म ढोल-ताशा ध्वज पथक ट्रस्टचा मदतीचा हात* संघर्ष अभ्यासिकेला...

सामाजिक बांधिलकी जपत नादब्रह्म ढोल-ताशा ध्वज पथक ट्रस्टचा मदतीचा हात* संघर्ष अभ्यासिकेला ११ हजार, गोगटे प्रशालेसाठी ५५ हजारांचे शैक्षणिक साहित्य आणि हृदया दरेकर यांच्या उपचारासाठी २१ हजारांची मदत

पुणे : ढोल-ताशाच्या परंपरेचा वारसा जपत सामाजिक बांधिलकीची जपणूक करणाऱ्या नादब्रह्म ढोल-ताशा ध्वज पथक ट्रस्टने वादन सरावाचा शुभारंभ उत्साहात केला. यावेळी विविध संस्था आणि गरजूंना तब्बल ८५ हजार रुपयांची आर्थिक व वस्तुरूपी मदत देण्यात आली. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात झालेल्या या सोहळ्यात सामाजिक बांधिलकी जपली गेली.

नादब्रह्म ढोल-ताशा ध्वज पथक ट्रस्टच्या सराव शुभारंभाचे आयोजन हिंगणे खुर्द सिंहगड रस्ता येथे करण्यात आले होते. यावेळी आमदार हेमंत रासने, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्टचे बाळासाहेब मारणे, नगरसेवक श्रीकांत जगताप, प्रसन्नदादा जगताप, देवेंद्र वडके, तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, नितीन पंडित, संजय मते, खारावडे म्हसोबा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा मधुरा भेलके प्रमुख पाहुणे म्हणून तसेच ट्रस्टचे खजिनदार कमलेश कामठे, उपाध्यक्ष विशाल भेलके आदी उपस्थित होते.

ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून युवा पिढी एकत्र येत असून त्याचा उपयोग समाजासाठी व्हावा, हा विचार स्तुत्य आहे. पथकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य व सेवा दिली जात आहे, अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. संघर्ष अभ्यासिकेला ११ हजारांची देणगी, गोगटे प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी ५५ हजार किमतीचे शैक्षणिक साहित्य तसेच हृदया दरेकर यांच्या उपचारासाठी २१ हजारांची आर्थिक मदत यावेळी देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments