Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीअंतर्गत* *बाल रुग्णांच्या कर्करोग निदानासाठी प्रथमच आर्थिक सहाय्य*...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीअंतर्गत* *बाल रुग्णांच्या कर्करोग निदानासाठी प्रथमच आर्थिक सहाय्य* · *त्रिपक्षीय करारातून राज्यातील २०० बालरुग्णांना मिळणार लाभ*

मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत बालरुग्णांच्या कर्करोग निदानासाठी प्रथमच स्वतंत्र आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. महागड्या निदान चाचण्यांमुळे उपचार प्रक्रियेत होणारा विलंब टाळून कर्करोगाचे वेळेत निदान व्हावे, यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे. या विशेष उपक्रमांतर्गत राज्यातील २०० आर्थिकदृष्ट्या दुर्बल कर्करोगग्रस्त बालरुग्णांना निदानासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय चाचण्यांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या लाभाअंतर्गत ० ते १८ वयोगटातील पात्र बालरुग्णांना कर्करोगाचे निदान निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक तसेच पुढील खर्चिक वैद्यकीय चाचण्यांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. या सहाय्यामुळे आर्थिक अडचणींमुळे निदान प्रक्रियेत होणारा विलंब टाळून वेळेत निदान आणि उपचाराचे प्रभावी नियोजन करणे शक्य होणार आहे.

पहिल्या दोन महिन्यांतच ५९ बालरुग्णांना ५० लाख रूपयांचे आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आले आहे. या सर्व बालरुग्णांचे कर्करोग निदान टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे करण्यात आले. बालरुग्णांच्या कर्करोग निदानासाठी प्रथमच सुरू करण्यात आलेला हा उपक्रम आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी महत्त्वाचा आधार ठरत आहे. वेळेत निदान झाल्यामुळे उपचाराला होणारा विलंब कमी होऊन बालरुग्णांना योग्य वेळी उपचार सुरू करण्यास मदत होत आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत बालरुग्णांच्या कर्करोग निदानासाठी प्रथमच स्वतंत्र आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. हा लाभ राज्यातील २०० आर्थिकदृष्ट्या दुर्बल कर्करोगग्रस्त बालरुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या २०० लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत ५९ बालरुग्णांना निदानासाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. गरजू रूग्णांनी अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १८००१२३२२११ वर संपर्क साधावा असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments