Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedकॅशफ्री पेमेंट्सकडून नवीन व्यवसायांसाठी मार्च २०२७ पर्यंत शून्य टक्‍के पेमेंट गेटवे शुल्काची...

कॅशफ्री पेमेंट्सकडून नवीन व्यवसायांसाठी मार्च २०२७ पर्यंत शून्य टक्‍के पेमेंट गेटवे शुल्काची घोषणा

पुणे, २२ जुलै २०२६ -कॅशफ्री पेमेंट्स या भारतातील आघाडीच्‍या एआय-नेटिव्ह पेमेंट्स कंपनीने आज आपल्या प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणाऱ्या सर्व नवीन व्यवसायांसाठी पेमेंट गेटवे शुल्क माफ करण्याची घोषणा केली आहे, तसेच ३१ मार्च २०२७ पर्यंत पहिल्या २० लाख रुपयांच्या ग्रॉस मर्चेंडाईज व्हॅल्यूवर (जीएमव्ही) शून्य टक्‍के शुल्क ऑफर केले आहे. ही ऑफर त्यांच्या स्वतःच्या ऑनलाईन चॅनेल्सवरील सुरुवातीच्या टप्प्यातील आणि वाढणाऱ्या विक्रेत्यांना लक्ष्य करून डिझाइन करण्यात आली आहे.

या ऑफरच्या माध्यमातून, कॅशफ्री पेमेंट्सचा व्यवसायांना सणासुदीच्या हंगामापूर्वी खराखुरा लाँचपॅड देण्‍याचा मनसुबा आहे. सणासुदीच्‍या काळात बहुतेक लहान व्यवसाय त्यांच्या वार्षिक व्यवसायाचा मोठा हिस्सा पूर्ण करतात, पण सामान्यतः हा काळ खर्चाच्या दबावासोबत येतो. विक्री उच्च पातळीवर असताना सवलती आणि ऑफर्समुळे नफ्याचे प्रमाण कमी होते आणि पेमेंट गेटवे शुल्क या नफ्याला आणखी कमी करते. या कालावधीतून आपले स्वतःचे शुल्क पूर्णपणे काढून टाकून कॅशफ्री विक्रेत्यांना त्यांचा नफा आणि रोख रक्कम परत मिळवून देत आहे, ज्याचा वापर ते इन्व्हेंटरी, जाहिराती किंवा लॉजिस्टिक्समध्ये करू शकतात.

कॅशफ्री पेमेंट्सचे सह-संस्थापक आणि सीईओ आकाश सिन्हा म्हणाले, ”एक सरासरी एसएमबी किंवा डी२सी व्यवसाय वार्षिक विक्रीच्या ४० टक्‍के विक्री सणासुदीच्या हंगामात करतो. या काळामध्ये पेमेंटची व्यवस्था अचूक असणे वर्षातील इतर कोणत्याही वेळेपेक्षा जास्त महत्त्वाचे असते. आमच्‍या निदर्शनास आले आहे की, सणांच्या हंगामापूर्वी नोंदणी करणाऱ्या ९० टक्‍के नवीन विक्रेत्यांची या संपूर्ण कालावधीत जीएमव्ही २० लाख रुपयांपेक्षा कमी नोंदवली जाते, ज्याचा अर्थ असा की, ही ऑफर प्रभावीपणे त्यांच्या संपूर्ण सणासुदीच्या कालावधीला कव्हर करते. व्यवसायासाठी ही मोठी सवलत आहे, ज्यामुळे ते पैसे ऑफर्स, इन्व्हेंटरी किंवा जिथे सर्वात जास्त गरज असेल तिथे वापरू शकतात. अशाच प्रकारचा लाँचपॅड प्रत्येक एसएमबीला आमच्यासोबत मिळावा, अशी आमची इच्छा आहे.”

शुल्क सवलतीसोबत नवीन व्यापारी अनेक दिवसांच्या उद्योग मानकांच्या तुलनेत कॅशफ्रीवर नोंदणी केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत लाईव्ह होऊ शकतात. त्यांना नेहमीच्या दोन दिवसांच्या सायकलऐवजी दुसऱ्याच दिवशी सेटलमेंट देखील मिळते, ज्यामुळे विक्रीच्या पीक काळामध्ये जाहिरातींच्या पुढील फेरीसाठी किंवा पुन्हा साठा खरेदी करण्यासाठी रोख प्रवाह सुधारतो. या ऑफर अंतर्गत ऑनबोर्ड होणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्याला नोंदणीच्या वेळेपासून समर्पित खाते व्यवस्थापक दिला जातो, ज्यामुळे विक्रेत्यांना या महत्त्वपूर्ण विक्रीच्या कालावधीत पूर्ण सहकार्य मिळेल. एकत्रितपणे पाहिल्यास, ही ऑफर शून्य-खर्च ऑनबोर्डिंगसह भारतातील एसएमबीसाठी आज उपलब्ध असलेली सर्वात जलद गो-लाइव्ह आणि सेटलमेंट सायकल एकत्र आणते, ज्यामुळे ही या उद्योगातील सणासुदीच्या हंगामातील सर्वात महत्त्वपूर्ण ऑफर ठरते.

सणासुदीच्या हंगामापूर्वी लाईव्ह होऊ इच्छिणारे व्यवसाय ३१ मार्च २०२७ पूर्वी या शून्य टक्‍के शुल्क ऑफरचा दावा करण्यासाठी cashfree.com वरील कॅशफ्री पेमेंट्सवर नोंदणी करू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments