भारत, 26 मार्च 2024 – भारतातील सर्वाधिक वापरकर्ता-केंद्रित, शास्त्रीय आणि नाविन्यपूर्ण ऑनलाइन स्कील-गेमिंग प्लॅटफॉर्म गेम्स 24×7, आपल्या काल्पनिक स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म, माय ११ सर्कल द्वारे सुरू केलेल्या नवीन मनोरंजक मोहिमेसह आयपीएल 2024 चा उत्साह वाढविण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘माय ११ सर्कल पे एक करोड तो बस एक शुरुवात हे, सोचो… कितनी बडी बात है, ही मोहीम वापरकर्त्यांची केवळ उत्सुकताच वाढवणार नाही तर थरार देखील वाढवेल. यामुळे सर्वात मोठी आणि प्रसिद्ध क्रिकेट स्पर्धा ही त्यांच्यासाठी अधिक आकर्षक ठरेल. तब्बल एक कोटी रुपयांहून अधिक रकमेचे पहिले पारितोषिक देणारी ही नवी योजना, क्रिकेट चाहत्यांना त्यांच्या निवडक खेळाडूंच्या कामगिरीचा अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी आणि या खेळाशी असलेले त्यांचे नाते अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आणि त्यांचा अनुभव वाढविण्यासाठी निमंत्रित करते.
सौरव गांगुली, शुभमन गिल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, ऋतुराज गायकवाड यांसह क्रिकेटमधील उत्तुंग व्यक्तिमत्वांसह रिंकू सिंग, यशस्वी जयस्वाल यांसारख्या नव्या उमेदीच्या खेळाडू व क्रिकेट सेन्सेशन्ससह माय ११ सर्कलच्या ब्रँड अॅम्बेसेडरच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित ही योजना क्रिकेटमधील उत्कंठा अधिक वाढवते. माय ११ सर्कल आयपीएलचा अधिकृत भागीदार आणि लखनौ सुपर जायंट्सचा टायटल प्रायोजक आहे, जो आपल्या वापरकर्त्यांचा अनुभव अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आणि या क्रिकेट स्पर्धेला एका नवीन उंचीवर नेण्यामधील आपली भूमिका अधिक भक्कम करतो.
ही योजना विविध प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. टेलिव्हिजनवर स्टार स्पोर्ट्सद्वारे, ओटीटीवर जिओ सिनेमाद्वारे आणि विविध सोशल मीडिया चॅनेलसह अनेक प्लॅटफॉर्मवर ही योजना उपलब्ध असेल. याव्यतिरिक्त, माय ११ सर्कलने अतिशय यशस्वी ठरलेल्या जीतो धन धना धनचे सादरीकरण प्रायोजक म्हणून जिओ सिनेमासोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे आयपीएल 2024 मध्ये इष्टतम ग्राहक कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ होईल.
या योजनेबद्दल बोलताना गेम्स २४ बाय ७ च्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सरोज पाणिग्रही म्हणाल्या, “आयपीएलचा हा हंगाम आमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा मैलाचा दगड आहे, कारण माय ११ सर्कल जगातील सर्वात भव्य क्रिकेट स्पर्धांपैकी एक असलेल्या आयपीएल २०२४ चा अधिकृत भागीदार असल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आयपीएलसह आमची अधिकृत भागीदारी, लखनौ सुपर जायंट्सचे टायटल प्रायोजकत्व आणि जिओ सिनेमासारख्या भागीदारांसह धोरणात्मक सहकार्य आणि चाहत्यांना गुंतवून ठेवणाऱ्या उपक्रमांचा फायदा घेत आमच्या योजनेद्वारे या स्पर्धेचा उत्सव साजरा करत आहोत. ही योजना देशभरातील क्रिकेटप्रेमींना आवडेल आणि प्रत्येक सामन्याबद्दल आणि प्रत्येक विजयाबद्दल उत्साह आणि अपेक्षेची भावना निर्माण करेल, याची आम्हाला खात्री आहे.
अतिशय आकर्षक अशा फिल्म्समधून माय ११ सर्कलचे ब्रँड अॅम्बेसेडर्स असलेले क्रिकेटमधील उत्तुंग खेळाडू मोठ्या व्यक्तिरेखा आणि भव्यतेचे कथानक सादर करत ‘माय ११ सर्कल पे एक करोड तो बस एक शुरुवात है, सोचो… कितनी बडी बात है’ या भावनेचा पुनरुच्चार करतील. माय ११ सर्कलवर एक कोटींचे बक्षीस मिळविण्याच्या निव्वळ संकल्पनेच्या पलीकडे जाणारी कथा प्रत्येक फिल्ममध्ये दाखवण्यात आली आहे. यामुळे प्रेक्षकांच्या मनात या योजनेत यापलिकडे आणखी काय काय असेल, याबाबतची उत्कंठा निर्माण होते आणि यात सहभागी होण्याची इच्छाही वाढते.


