Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedबँक ऑफ बडोदाने आपल्या ११९ व्या स्थापना दिनानिमित्त विविध डिजिटल सेवा, रिटेल...

बँक ऑफ बडोदाने आपल्या ११९ व्या स्थापना दिनानिमित्त विविध डिजिटल सेवा, रिटेल कर्ज आणि लघु उद्योगांसाठी नव्या योजना सुरू केल्या आहेत

बँकेच्या ११९ व्या वर्षाची संकल्पना ‘लीडिंग विथ ट्रस्ट’ (विश्वासार्हतेसह नेतृत्व) ही आहे. त्यांचा प्रामाणिकपणा, नावीन्य आणि सर्वसमावेशकतेसह नेतृत्व करण्याची वचनबद्धता यामधून दिसून येते.

‘आरोहण जीसीआयसी – AAROHAN GCIC’, नवीन ‘बॉब वर्ल्ड – bob World’ आणि ‘अदिती – ADITI’ लाँच करून बँकेने आपले तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्व अधिक मजबूत केले आहे.

मुंबई, २२ जुलै, २०२६: भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील एक अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने आपला ११९ वा स्थापना दिन साजरा केला. या निमित्ताने बँकेने ग्राहकांचा विश्वास, नवनवीन तंत्रज्ञान आणि सातत्यपूर्ण प्रगती या गोष्टींना आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असे पुन्हा एकदा जाहीर केले. बँकेच्या या ११९ व्या वर्षाची मुख्य संकल्पना ‘लीडिंग विथ ट्रस्ट’ (विश्वासार्हतेसह नेतृत्व) अशी आहे. प्रामाणिकपणा, नवीन विचार आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे, हाच बँकेचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक ग्राहकासोबतचे नाते हे विश्वासावर टिकून राहील आणि याच विश्वासाच्या जोरावर बँक भविष्यातही प्रगती करत राहील, असा विश्वास बँकेने व्यक्त केला आहे. या खास दिवसाचे औचित्य साधून बँकेने ग्राहकांसाठी अनेक नवनवीन योजना आणि उपक्रम सुरू केले आहेत. यामध्ये तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नवीन डिजिटल सुविधा आणणे, लहान-मोठ्या व्यावसायिकांसाठी व वैयक्तिक कर्ज सुविधा, पर्यावरणपूरक कामांसाठी आर्थिक मदत, प्रत्येक नागरिकापर्यंत बँकिंग सेवा पोहोचवणे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

बँकेचे ग्लोबल ब्रँड ॲम्बेसेडर आणि महान क्रिकेटपटू श्री सचिन तेंडुलकर या स्थापना दिन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बँकेचे मोबाईल बँकिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ‘बॉब वर्ल्ड’ (bob World) च्या नवीन रूपाचे अनावरण त्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ग्राहकांना अधिक सुरक्षित, सोपा, स्मार्ट आणि त्यांच्या गरजेनुसार बँकिंगचा अनुभव देण्यासाठी या ॲपची पुनर्रचना करण्यात आली आहे. यासोबतच, बँकेने ‘आरोहण जीसीआयसी’ (AAROHAN GCIC) या आपल्या ग्लोबल कॅपेबिलिटी, इनोव्हेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन सेंटरचे उद्घाटन केले. हे केंद्र तंत्रज्ञान, संशोधन, डिजिटल परिवर्तन आणि नाविन्यतेचे मुख्य केंद्र म्हणून काम करेल. यामुळे बँकेच्या तंत्रज्ञानाचा वेग वाढेल आणि भविष्यासाठी सज्ज असलेल्या बँकिंग सेवा तयार केल्या जातील. याच कार्यक्रमात बँकेने ‘अदिती २.०’ (ADITI 2.0) हे आपले इंटेलिजेंट व्हर्च्युअल फ्रंट ऑफिस देखील सादर केले. यामुळे ग्राहकांना बोलून संवाद साधता येईल आणि विविध भाषांमध्ये सोप्या पद्धतीने डिजिटल बँकिंगचा वापर करता येईल.

या सोहळ्यात बँकेने इतरही अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या. यामध्ये ‘बॉब एलिव्हेट’ (bob Elev8) होम लोन योजना, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स आणि बॅटरी-स्वॅपिंग पायाभूत सुविधांसाठी वित्तपुरवठा करणारी ‘बॉब ग्रीन प्लग’ (bob Green PLUG) कर्ज योजना, आणि लघु उद्योजकांसाठी ‘बॉब अग्निवीर एमएसएमई’ (bob Agniveer MSME) वित्तपुरवठा योजना यांसारख्या विविध उपक्रमांचा समावेश आहे. देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत बँकिंग सेवासुविधा पोहोचवण्याप्रती आपली वचनबद्धता अधिक दृढ करत, बँकेने देशभरात ११९ नवीन बिझनेस करस्पॉन्डंट (BC) केंद्रे देखील सुरु केली आहेत. यामुळे ग्रामीण आणि अद्याप बँकिंग सेवा न पोहोचलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना देखील बँकेच्या सेवासुविधा मिळणे अधिक सोपे होणार आहे.

या प्रसंगी बोलताना बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. देबदत्त चंद म्हणाले, “आमच्या ११९ व्या स्थापना दिनाची मुख्य संकल्पना ‘लीडिंग विथ ट्रस्ट’ (विश्वासार्हतेसह नेतृत्व) ही आहे. बँक ऑफ बडोदाने एक शतकाहूनही अधिक काळ ज्या मूल्यांच्या आधारे वाटचाल केली आहे त्यांना ही संकल्पना अधोरेखित करते. सातत्यपूर्ण आणि जबाबदारीचे भान राखत प्रगती करण्याचा आमचा हा प्रवास पुढे चालू ठेवत असताना, ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ करणे, नवसंशोधनाला चालना देणे, शाश्वततेला पुढे नेणे आणि आमच्या सर्व हितधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करणे यावर आमचा मुख्य भर राहील. हा विश्वासच आमचा पाया असेल, ज्यावर आम्ही आमचे भविष्य घडवू.”

प्रमुख उपक्रम आणि उत्पादनांचे सादरीकरण

१. तंत्रज्ञान आणि डिजिटल
आरोहण जीसीआयसी (AAROHAN GCIC): बँक ऑफ बडोदाने ‘आरोहण जीसीआयसी’चे म्हणजेच आपल्या ‘ग्लोबल कॅपेबिलिटी, इनोव्हेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन सेंटर’चे उद्घाटन केले. तंत्रज्ञान, संशोधन, डिजिटल परिवर्तन आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांचे मुख्य केंद्र म्हणून या सेंटरची रचना करण्यात आली आहे. भविष्यातील बँकिंग गरजांसाठी सज्ज असलेल्या आधुनिक सेवा विकसित करण्यासाठी आणि त्यांचा विस्तार करण्यासाठी हे केंद्र प्रतिभावंत, नवीन तंत्रज्ञान आणि सामूहिक विचारांना एका व्यासपीठावर आणेल. बँकिंग सेवांची गुणवत्ता, कामाची शिस्त आणि संस्थात्मक क्षमता अधिक मजबूत करण्यासाठी हे केंद्र बँकेच्या ‘सीएमएमआय लेव्हल ३’ (CMMI Level 3) मान्यताप्राप्त विकास आणि सेवा पद्धतींचा वापर करेल. हे केंद्र संपूर्ण बँकेत तंत्रज्ञानाचा वेग वाढवेल आणि आर्थिक सेवांचे भविष्य बदलण्याच्या बँकेच्या उद्दिष्टाला पूरक अशी नाविन्यपूर्ण संस्कृती रुजवेल.

‘बॉब वर्ल्ड’ (bob World) चे नवीन रूप: बँक ऑफ बडोदाने आपल्या मोबाईल ॲपची नवीन आवृत्ती सादर केली आहे, जी आधुनिक असून, काळासोबत विस्तारणाऱ्या डिजिटल संरचनेवर आधारित आहे. ग्राहकांच्या बदलत्या गरजा ध्यानात घेऊन या प्लॅटफॉर्मची रचना करण्यात आली आहे. हे ॲप आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हायपर-पर्सनलाइज्ड अनुभव, संवाद साधून बँकिंग करण्याची सुविधा आणि बहुभाषिक पर्याय यांमुळे ग्राहकांना अधिक स्मार्ट, सोपा आणि सुरक्षित बँकिंग अनुभव देते. प्रगत पडताळणी पद्धती आणि सायबर फसवणुकीपासून संरक्षण देणाऱ्या वैशिष्ट्यांमुळे या ॲपची सुरक्षा अधिक मजबूत झाली आहे. यासोबतच यामध्ये सर्व प्रकारच्या बँकिंग सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नवीन ॲपमध्ये ‘पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट’ (वैयक्तिक आर्थिक नियोजन) ही नवीन सुविधा जोडण्यात आली आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या एकूण वित्त नियोजनाची माहिती एकाच ठिकाणी मिळेल, खर्चाच्या पद्धतींवर लक्ष ठेवता येईल आणि आर्थिक उद्दिष्टे आखता येतील. ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय या नवीन ॲपचा लाभ घेता यावा, यासाठी ही नोंदणी प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाईल.

अदिती २.० (ADITI 2.0): बँक ऑफ बडोदाने ‘अदिती २.०’ हे आपले इंटेलिजेंट व्हर्च्युअल फ्रंट ऑफिस सादर केले आहे, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असलेल्या व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजरचे प्रगत रूप आहे. प्रगत बहुभाषिक आणि बोलून संवाद साधता येणाऱ्या एआय इंजिनवर आधारित, अदिती २.० ग्राहकांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत बँकेशी नैसर्गिक संवाद साधण्याची सुविधा देते. हे ग्राहकांना केवळ नवीन उत्पादने आणि सेवा शोधण्यातच मदत करत नाही, तर सोप्या संवाद पद्धतीद्वारे विविध बँकिंग व्यवहार पूर्ण करण्याचे स्वातंत्र्यही देते. अदिती २.० ग्राहकांना वैयक्तिक गरजेनुसार आणि २४ तास मदत पुरवते, ज्यामुळे बँकिंग सेवा अधिक सर्वसमावेशक, सुलभ आणि सोयीस्कर बनतात.

युपीआय ग्लोबल – आंतरराष्ट्रीय क्यूआर पेमेंटची सुविधा: बँक ऑफ बडोदाने ‘युपीआय ग्लोबल रिव्हर्स एक्सेप्टन्स’ सेवा सुरू केली आहे. यामुळे आता भारतातील बँक ऑफ बडोदाचे युपीआय क्यूआर कोड वापरणाऱ्या व्यापाऱ्यांना आंतरराष्ट्रीय पर्यटकांकडून, अनिवासी भारतीयांकडून आणि पात्र देशांमधील परदेशी डिजिटल वॉलेट वापरणाऱ्यांकडून थेट पेमेंट स्वीकारता येईल. हे परदेशी नागरिक त्यांच्या स्वतःच्या देशातील बँकिंग किंवा फिनटेक ॲप्सद्वारे अगदी सहज पेमेंट करू शकतील. या उपक्रमामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांना पेमेंट करणे सोपे होईल, देशातील व्यापाऱ्यांसाठी व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण होतील आणि डिजिटल पेमेंट व्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल.

एटीएम एनएफसी-आधारित टॅप आणि ट्रान्झॅक्ट: आपल्या डिजिटल परिवर्तनाचा एक भाग म्हणून, बँक ऑफ बडोदा आपल्या नव्याने बसवण्यात आलेल्या एटीएम आणि कॅश रिसायकल मशीनमध्ये एनएफसी सुविधा सुरू करत आहे. अशी सुविधा सुरू करणारी ही या क्षेत्रातील पहिलीच बँक ठरली आहे. ही सुविधा पूर्णपणे लागू झाल्यानंतर, ग्राहकांना एटीएम मशीनमध्ये आपले कार्ड आत टाकण्याची गरज भासणार नाही. ते मशीनच्या रीडरवर आपले एनएफसी-सक्षम डेबिट कार्ड फक्त टॅप करून एटीएमचे व्यवहार पूर्ण करू शकतील. या संपर्करहित सुविधेमुळे ग्राहकांना अधिक वेगवान, सोपे आणि सुरक्षित व्यवहार करता येतील.

२. रिटेल कर्ज
बॉब एलिव्हेट होम लोन (bob Elev8 Home Loan): बँक ऑफ बडोदाने तरुण पगारी नोकरदारांसाठी ‘बॉब एलिव्हेट होम लोन’ ही एक विशेष गृहकर्ज योजना सुरू केली आहे. तरुण नोकरदारांचे उत्पन्न वाढण्याच्या क्षमतेमध्ये भविष्यात वाढ होऊ शकते हे लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आली आहे. सध्याचे उत्पन्न आणि घरांच्या वाढत्या किमती यांमधील फरक दूर करण्यासाठी यात ‘स्टेप-अप ईएमआय’ पद्धत दिली आहे. म्हणजेच सुरुवातीला कमी हप्ता असेल आणि जसजसे नोकरदारांचे उत्पन्न वाढेल, तसतसा कर्जाचा हप्ता टप्प्याटप्प्याने वाढत जाईल. यामुळे ग्राहकांना सुरुवातीलाच जास्त रकमेचे कर्ज मिळण्यास मदत होईल.

खाजगी बिल्डर्सकडून निवासी भूखंड खरेदीसाठी ‘बॉब स्वभूमी’ होम लोन: बँक ऑफ बडोदाने खाजगी बिल्डर्स आणि डेव्हलपर्सकडून निवासी भूखंड (प्लॉट) खरेदी करू इच्छित असलेल्या ग्राहकांसाठी ‘बॉब स्वभूमी’ ही विशेष गृहकर्ज योजना सुरू केली आहे. ही योजना केवळ रेरा मान्यताप्राप्त प्रकल्पांसाठीच लागू असेल. यामध्ये ग्राहकांना परतफेडीचे लवचिक पर्याय मिळतील आणि प्रकल्पाच्या प्रगतीनुसार टप्प्याटप्प्याने कर्जाची रक्कम दिली जाईल.

बॉब पाल – पोर्टफोलिओ-बॅक्ड अप्रूव्ड लिमिट (bob PAL): बँक ऑफ बडोदाने ‘बॉब पाल’ ही डिजिटल ओव्हरड्राफ्ट सुविधा सुरू केली आहे, ज्याद्वारे पात्र गुंतवणुकीच्या बदल्यात ग्राहकांना ५ कोटी रुपयांपर्यंत निधी मिळू शकतो. ही सुविधा शेअर्स, म्युच्युअल फंड, बाँड्स, डिबेंचर्स आणि सॉव्हरेन गोल्ड बाँड्स यांवर उपलब्ध आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ न विकता वैयक्तिक किंवा व्यवसायाच्या तातडीच्या गरजांसाठी झटपट पैसे मिळवता येतील. विशेष म्हणजे, यादरम्यान ग्राहकांना त्यांच्या गुंतवणुकीवरील लाभांश आणि बोनसचे फायदे मिळतच राहतील.

३. एमएसएमई आणि पुरवठा साखळी सुविधांसाठी वित्तपुरवठा
बॉब अग्निवीर योजना (bob Agniveer Scheme): बँक ऑफ बडोदाने अग्निपथ योजनेअंतर्गत निवृत्त झालेल्या अग्निवीरांसाठी ‘बॉब अग्निवीर योजना’ नावाचा एक विशेष एमएसएमई कर्ज कार्यक्रम सुरू केला आहे. या योजनेद्वारे माजी अग्निवीरांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी, जुन्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी किंवा रोजच्या खेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी गरजेनुसार ५ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. सीजीटीएमएसई किंवा एनसीजीटीसीच्या पाठबळासह, अत्यंत आकर्षक सवलती आणि सुलभ तारण अटींवर हे कर्ज उपलब्ध आहे. माजी अग्निवीरांना उद्योजक बनवून स्वावलंबी करणे, रोजगार निर्मितीला चालना देणे आणि एमएसएमई क्षेत्राला अधिक मजबूत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

कॉर्पोरेट इनव्हॉइस फायनान्सिंग: आपल्या पुरवठा साखळी वित्तपुरवठा सेवांना अधिक बळकट करण्यासाठी, बँक ऑफ बडोदाने ५०० कोटी रुपयांपर्यंत वार्षिक आर्थिक उलाढाल असलेल्या एमएसएमई उद्योगांसाठी ‘कॉर्पोरेट इनव्हॉइस फायनान्सिंग’ सेवा सुरू केली आहे. यामुळे उद्योजकांना रोजच्या कामासाठी खेळते भांडवल अगदी झटपट मिळू शकेल. या सुविधेमुळे मुख्य मोठ्या कंपन्या त्यांच्या पुरवठादारांना आणि विक्रेत्यांना त्यांनी सादर केलेल्या बिलांच्या आधारे कर्ज मिळवून देऊ शकतील. परिणामी, बाजारातील पैशांची उपलब्धता सुधारेल, खेळत्या भांडवलाचे योग्य नियोजन होईल आणि पुरवठा साखळीमध्ये सर्वांना वेळेवर पैसे मिळतील. हा उपक्रम व्यावसायिक भागीदारी मजबूत करण्यास आणि एमएसएमई उद्योगांना सहज कर्ज मिळवून देण्यास मदत करतो.

४. हरित वित्तपुरवठा (पर्यावरणपूरक आणि निसर्गाचे रक्षण करणाऱ्या उपक्रमांना आणि उद्योगांना वित्त पुरवठा)
बॉब ग्रीन प्लग – भारताच्या ईव्ही पायाभूत सुविधांसाठी वित्तपुरवठा (bob Green PLUG): बँक ऑफ बडोदाने ‘बॉब ग्रीन प्लग’ ही एमएसएमई कर्ज योजना सुरू केली आहे. देशभरात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स, बॅटरी स्वॅपिंगच्या पायाभूत सुविधा आणि त्याच्याशी संबंधित इतर सुविधा उभारण्यासाठी किंवा त्यांचा विस्तार करण्यासाठी अर्थसाहाय्य दिले जाईल. ही योजना अपारंपरिक ऊर्जेवर चालणाऱ्या चार्जिंग सुविधांना देखील मदत करते, ज्यामध्ये छतावरील सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चार्जिंग स्टेशन्सचा समावेश आहे. ५ कोटी रुपयांपर्यंतच्या कर्ज सुविधेसह, ‘बॉब ग्रीन प्लग’ भारतातील वाढत्या ईव्ही क्षेत्राला पाठबळ देते, पर्यावरणपूरक प्रवासाला चालना देते आणि शाश्वत कामांसाठी वित्तपुरवठ्याप्रती बँकेची वचनबद्धता अधिक मजबूत करते.

५. बिझनेस बँकिंग
मास्टरस्ट्रोक करंट अकाऊंट (Masterstroke Current Account): बँक ऑफ बडोदा व्यवसायिकांसाठी ‘मास्टरस्ट्रोक करंट अकाऊंट’ हे एक प्रीमियम चालू खाते सुरू करत आहे. हे खाते व्यवसायांना प्रगत बँकिंग आणि व्यवहार करण्याची क्षमता प्रदान करते. यामध्ये रोज १ कोटी रुपयांपर्यंत मोफत रोख रक्कम जमा (free cash deposit) करण्याची सुविधा, मोफत साउंडबॉक्स क्यूआर (Soundbox QR) आणि पीओएस (POS) मशीन, ‘बॉब डिजि उद्यम’ (bob Digi Udyam) द्वारे कोणत्याही तारणाशिवाय २ कोटी रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्ट सुविधा, आणि व्यवसायातील मुख्य व्यक्तीसाठी २ कोटी रुपयांपर्यंतचा वैयक्तिक अपघात विमा समाविष्ट आहे. यासोबतच, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांवर लाउंज सुविधांचा लाभ घेण्यासा अनेक विशेष फायदे देणारे प्रीमियम डेबिट कार्ड आणि निवडक बँकिंग सेवांवर सवलतीचे दर ग्राहकांना मिळतील, ज्यामुळे वाढत्या व्यवसायांसाठी हा एक परिपूर्ण बँकिंग पर्याय ठरतो.

६. वित्तीय समावेशन (देशातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग सेवा उपलब्ध करवून देणे)
११९ बिझनेस करस्पॉन्डंट केंद्रे: आपल्या ११९ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून बँक ऑफ बडोदाने देशभरात ११९ नवीन बिझनेस करस्पॉन्डंट केंद्रांचे उद्घाटन केले आहे, ज्यामुळे बँकेचे वित्तीय समावेशन नेटवर्क अधिक मजबूत झाले आहे. ही नवीन बिझनेस करस्पॉन्डंट केंद्रे ग्रामीण, दुर्गम आणि अद्याप बँकिंग सेवा न पोहोचलेल्या किंवा अपुऱ्या बँकिंग सेवा असलेल्या भागांमध्ये आवश्यक बँकिंग सेवांचा विस्तार करतील. यामुळे प्रत्येकापर्यंत बँकिंग सेवा पोहोचवण्याची बँकेची वचनबद्धता अधिक दृढ होते आणि सर्वांगीण विकासाच्या सरकारी उद्दिष्टाला मोठे पाठबळ मिळते.

प्रधानमंत्री जन-धन योजना ग्राहकांसाठी बहुभाषिक व्हॉट्सॲप बँकिंग: आपल्या डिजिटल वित्तीय समावेशन उपक्रमांचा एक भाग म्हणून, बँक ऑफ बडोदाने प्रधानमंत्री जन-धन योजना खातेधारकांसाठी ‘बहुभाषिक व्हॉट्सॲप बँकिंग’ सेवा सुरू केली आहे. या उपक्रमामुळे ग्राहकांना, विशेषतः ग्रामीण, निमशहरी आणि बँकिंग सेवा न पोहोचलेल्या किंवा कमी पोहोचलेल्या भागातील लोकांना, त्यांच्या आवडीच्या प्रादेशिक भाषेत व्हॉट्सॲपद्वारे अगदी सोयीस्करपणे बँकिंग सेवांचा वापर करता येईल. यामुळे बँकिंग सेवा अधिक सुलभ होतील आणि ग्राहकांना त्यातून मिळणारा अनुभवही अधिक चांगला होईल.

आपल्या ११९ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून, बँक ऑफ बडोदाने आपल्या विभागीय (झोनल) आणि प्रादेशिक (रिजनल) कार्यालयांच्या माध्यमातून देशभरात वृक्षारोपण मोहीम सुरू केली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याप्रती आणि समाज हिरवागार व समृद्ध करण्याप्रती असलेली आपली वचनबद्धता बँकेने यातून अधोरेखित केली आहे.

***

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments