Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedजमिनीचा भूभाग खचल्याने मढेघाट मार्ग वाहतुकीसाठी बंद* *पुण्याकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग जाहीर*

जमिनीचा भूभाग खचल्याने मढेघाट मार्ग वाहतुकीसाठी बंद* *पुण्याकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग जाहीर*

पुणे, दि. २३ (जिमाका, वृत्तसेवा) : राजगड (वेल्हा) तालुक्यातील राजगड (वेल्हे)-केळद रोड (मढेघाट) प्रजिमा क्र. १०६, कि.मी. ४६/०० येथे जमिनीचा भूभाग खचल्यामुळे रस्ता पूर्णपणे खचला असून, सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मार्ग पुढील आदेशापर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी निर्गमीत केला आहे.

रस्ता बंद असल्यामुळे केळद पंचक्रोशी भागातील नागरिकांनी राजगड (वेल्हा) व पुण्याकडे जाण्यासाठी केळद – निगडे खुर्द – कुंबळे – चांदवणे – भुतोंडे – पाल बुद्रुक – वाजेघर – खरोव मार्गे राजगड (वेल्हे) व पुढे पुणे या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम ११५ तसेच शासनाच्या गृह विभागाच्या १९ मे १९९० च्या अधिसूचनेनुसार प्राप्त अधिकारानुसार हा आदेश जारी करण्यात आला आहे.
00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments