Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedराजगड (वेल्हा) – बालवड – शेनवड मार्गावरील रस्ता खचल्याने वाहतुकीसाठी बंद*

राजगड (वेल्हा) – बालवड – शेनवड मार्गावरील रस्ता खचल्याने वाहतुकीसाठी बंद*

पुणे, दि. २३ (जिमाका, वृत्तसेवा) : राजगड (वेल्हा) तालुक्यातील अतिवृष्टीमुळे माळवडी-जोगवडी-भुतुंडे-बालवड- शेनवड प्रजिमा ४३ किमी ४९/६०० (बलवड) येथे जमिनीचा भूभाग खचून रस्ता पूर्णपणे खचल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सदरचा रस्ता बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचा आदेश निर्गमित केला आहे.

या आदेशानुसार सदर गावातील नागरिकांना राजगड (वेल्हा) ते पुणे येथे जाण्यासाठी गोहिणी येथील वाहतूक गोहिणी-भुतुंडे-पाल बु.- वाजेघर- खरीव मार्गाने वेल्हे व पुणे या पर्यायी मार्गाचा अवलंब करता येईल. बलवड येथील वाहतूक शेनवड-पासली- जाधववाडी-भट्टी मार्गाने राजगड (वेल्हा) व पुणे कडे जाता येईल.

मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम ११५ तसेच शासनाच्या गृह विभागाच्या १९ मे १९९० च्या अधिसूचनेनुसार प्राप्त अधिकारानुसार हा आदेश जारी करण्यात आला आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments