पुणे : भारतात सुमारे प्रत्येक सहा जोडप्यांपैकी एक जोडपे वंध्यत्वाच्या समस्येला सामोरे जात आहे. ही समस्या पुरुष आणि महिलांमध्ये जवळपास समान प्रमाणात आढळते. सध्या वंध्यत्वाच्या सुमारे ४० ते ५० टक्के प्रकरणांमध्ये पुरुष घटक कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. तसेच, वयाच्या विशीच्या उत्तरार्धात आणि तिशीच्या सुरुवातीच्या वयोगटातील महिलांमध्ये स्त्रीबीज गुणवत्तेशी संबंधित समस्या वाढत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. या पार्श्वभूमीवर नोवा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या लुल्लानगर केंद्रात आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विकसित करण्यात आलेली अत्याधुनिक एम्ब्रायोलॉजी लॅब सुरू करण्यात आली आहे.
या लॅबमध्ये प्रगत इनक्यूबेटर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित शुक्राणू व भ्रूण मूल्यांकन प्रणाली, इलेक्ट्रॉनिक विटनेसिंग सिस्टीम तसेच हवेच्या गुणवत्तेचे सातत्याने निरीक्षण करणारी यंत्रणा उपलब्ध आहे. यामुळे भ्रूण विकासाला पोषक वातावरण मिळण्यास, रुग्णांच्या सुरक्षिततेत वाढ होण्यास आणि आयव्हीएफ उपचारांचे परिणाम अधिक अचूक होण्यास मदत होते.
आरएफआयडी-आधारित इलेक्ट्रॉनिक विटनेसिंग सिस्टीम, अचुक गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया आणि सतत देखरेख यामुळे प्रत्येक भ्रूणाची काळजीपूर्वक आणि सुरक्षित हाताळणी केली जाते. याशिवाय, उपचारादरम्यान भ्रूणाच्या विकासाविषयी रुग्णांना नियमित माहिती दिली जाते. प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्याची पडताळणी केली जात असल्याने जोडप्यांचा विश्वास अधिक दृढ होतो आणि उपचार प्रक्रियेदरम्यानचा मानसिक ताण कमी होण्यास मदत मिळते.
नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, लुल्लानगर येथील वंधत्व निवारण तज्ज्ञ डॉ. रुपाली तांबे म्हणाल्या, ४२ वर्षीय मीरा आणि ४३ वर्षीय राजेश (गोपनीयतेसाठी नावे बदलण्यात आली आहेत) या जोडप्याला दुसऱ्या अपत्यासाठी दीर्घकाळ प्रयत्न करूनही यश मिळत नव्हते. त्यांच्या प्रकरणात वैयक्तिक गरजांनुसार आयव्हीएफ उपचारांची आखणी करण्यात आली. महिलेचे वय आणि अंडाशयाची क्षमता लक्षात घेऊन औषधोपचार व स्टिम्युलेशन प्रोटोकॉल ठरविण्यात आला. जोडप्याच्या वाढत्या वयाचा विचार करून एम्ब्रायोलॉजी टीमने प्रगत शुक्राणू निवड, जनुकीय तपासणी आणि सर्वाधिक योग्य भ्रूणाची निवड केली. परिणामी पहिल्याच आयव्हीएफ सायकलमध्ये सकारात्मक परिणाम मिळाला. गर्भधारणेदरम्यानचा धोका कमी करण्यासाठी एकच भ्रूण प्रत्यारोपित करण्यात आला. वैयक्तिकृत वैद्यकीय उपचार आणि अत्याधुनिक आयव्हीएफ लॅब यांच्या एकत्रित मदतीने गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्येही यशस्वी परिणाम साधता येतात.
आयव्हीएफ उपचारामध्ये एम्ब्रायोलॉजी लॅबला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. भ्रूणाची गुणवत्ता ही आयव्हीएफ उपचारांच्या यशामध्ये किमान ४० ते ६० टक्के भूमिका बजावते. गॅमेट( gamete) , शुक्राणू आणि भ्रूण यांचे संगोपन उपचारांच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये नियंत्रित वातावरणात या लॅबमध्ये केले जाते.
नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीचे हेड एम्ब्रायोलॉजी आणि सायंटिफिक डायरेक्टर डॉ. पी. जी. एल. ललित कुमार म्हणाले, आयव्हीएफ लॅबमध्ये आम्ही नैसर्गिकरित्या गर्भाशयात जी प्रक्रिया घडते, त्याचीच पुनर्रचना करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही सर्व प्रक्रिया एआरटी कायदा २०२१ नुसार पार पाडतो. भ्रूणांच्या सुरक्षेसाठी अत्यंत काटेकोर उपाययोजना केल्या जातात. गॅमेट( gamete) आणि भ्रूणांची अदलाबदल होण्याचा धोका टाळण्यासाठी इलेक्ट्रॉनिक विटनेसिंग सिस्टीमचा वापर केला जातो. ही अत्यंत अचूक तंत्रज्ञान प्रणाली आयव्हीएफ प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर देखरेख ठेवते. या शिवाय, देशातील ७५ हून अधिक शहरांमधील १२० पेक्षा जास्त केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या एम्ब्रायोलॉजिस्टना आमच्या अकादमीमार्फत विशेष प्रशिक्षण दिले जाते. आयव्हीएफ उपचारादरम्यान जोडप्यांना होणाऱ्या भावनिक तणावाची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे पारदर्शकता, वैज्ञानिक अचूकता आणि उच्च दर्जाची सेवा यांद्वारे आम्ही त्यांचा विश्वास जपण्याचा प्रयत्न करतो.
फर्टिलिटी क्लिनिक निवडताना काय पाहावे?
तज्ज्ञांच्या मते, फर्टिलिटी क्लिनिकची निवड करताना ते एआरटी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत आहे का, याची खात्री करणे आवश्यक आहे. उपचारांचे यशाचे प्रमाण, खर्च आणि प्रक्रिया याबाबत क्लिनिकने पारदर्शकता ठेवली पाहिजे. आयव्हीएफ उपचारांना शंभर टक्के यशाची हमी नसते, कारण प्रत्येक रुग्णाची परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे डॉक्टर, एम्ब्रायोलॉजिस्ट आणि प्रयोगशाळेच्या गुणवत्ता मानकांनाही महत्त्व द्यावे. तसेच आर्थिक, वैद्यकीय आणि मानसिक समुपदेशनाची सुविधा देणारे क्लिनिक निवडल्यास उपचार अधिक परिणामकारक ठरू शकतात.


