Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत तुकाराम महाराज बीज निमित्त अभिवादन..

पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत तुकाराम महाराज बीज निमित्त अभिवादन..

पिंपरी,दि.२७ मार्च २०२४:- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील संत तुकाराम महाराज बीज निमित्त त्यांच्या संत तुकारामनगर तसेच भक्ती-शक्ती चौक निगडी येथील पुतळ्यास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

संत तुकाराम नगर,पिंपरी येथील कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड,क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक , सामाजिक कार्यकर्ते नंदु कदम आदी उपस्थित होते. तर निगडी येथील कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सहाय्यक आरोग्याधिकारी राजू साबळे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments