Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorized*माजी सैनिक, पत्नी व पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’; १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे...

*माजी सैनिक, पत्नी व पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’; १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

पुणे, दि. २७ : विविध क्षेत्रात उल्लेखनीय व अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, त्यांच्या पत्नी व पाल्यांचा एकरकमी विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी दिली आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांनी १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

या विशेष गौरव पुरस्कारांतर्गत खेळ, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी, सामाजिक कार्य, पर्यावरण संवर्धन आदी क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे.

शैक्षणिक क्षेत्रात सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वीमध्ये ९० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक, तसेच १२ वीमध्ये ८५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी, पदवी अथवा पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविणारे माजी सैनिकांचे पाल्य, तसेच IIT, IIM, AIIMS यांसारख्या नामांकित राष्ट्रीय संस्थांमध्ये प्रवेश मिळविणाऱ्या माजी सैनिकांच्या पाल्यांनाही विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय यशस्वी उद्योजकांचाही सन्मान करण्यात येईल.

या पुरस्कारासाठीचा विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे उपलब्ध असून, पात्र माजी सैनिक, माजी सैनिकांच्या पत्नी तसेच माजी सैनिकांच्या विधवांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज निर्धारित मुदतीत कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर एस. फिरासत (नि.) यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments