नमिता थापर यांच्या नेतृत्वाखाली देशभर राबविण्यात येणार हा सोशल मीडियावर आधारित जनजागृती उपक्रम
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या ३० सेकंदांच्या व्हिडीओंद्वारे लठ्ठपणाबाबत शास्त्रीय माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याची योजना
भारतातील वाढत्या लठ्ठपणाच्या पार्श्वभूमीवर लोकांना अधिक निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्यासाठी प्रोत्साहन
देशभरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून लठ्ठपणाबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर
दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या परिषद आणि पुरस्कार कार्यक्रमाने होईल या उपक्रमाची सांगता
मुंबई, २७ जुलै २०२६ : भारतात लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना, नमिता थापर त्यांच्या ‘अर्थ बाय एमक्युअर’ या वेलनेस ब्रँडतर्फे ‘फाइट अगेन्स्ट ओबेसिटी’ हा जनजागृती उपक्रम सुरू करीत आहेत. सोशल मीडियाला केंद्रस्थानी ठेवून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश लठ्ठपणाकडे पाहण्याचा आणि त्याबाबत बोलण्याचा दृष्टिकोन बदलणे हा आहे. टीका किंवा दोषारोप करण्याऐवजी लोकांमध्ये प्रेरणा आणि जागरूकता निर्माण करण्यावर या उपक्रमात भर दिला जाणार आहे.
या उपक्रमात आघाडीचे डॉक्टर, आरोग्यतज्ज्ञ आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त व्यक्ती सहभागी होणार आहेत. ते लठ्ठपणाबाबत उपयुक्त माहिती देतील, प्रचलित गैरसमज दूर करतील आणि लठ्ठपणा, योग्य आहार, चयापचय (मेटाबॉलिझम) तसेच दीर्घकाळ वजन नियंत्रणात ठेवण्याच्या योग्य पद्धती याबाबतची माहिती सोप्या भाषेत समजावून सांगतील.
याविषयी बोलताना ‘अर्थ बाय एमक्युअर’च्या संस्थापिका नमिता थापर म्हणाल्या, “लठ्ठपणा ही संपूर्ण जगासमोरील एक मोठी समस्या आहे आणि ‘अर्थ’ या विषयासाठी कटिबद्ध आहे. लोकांमध्ये योग्य माहिती पोहोचावी आणि त्यातून सकारात्मक बदल घडावा यासाठी मी स्वतः देशातील आघाडीच्या डॉक्टरांच्या मुलाखती घेत आहे. विशेष म्हणजे ही माहिती केवळ ३० सेकंदांच्या व्हिडीओंद्वारे दिली जाणार आहे. त्यामुळे ती रंजक असेल आणि उपदेशासारखी वाटणार नाही.”
या उपक्रमाला ‘अर्थ’च्या लोकप्रिय बिटर ड्रॉप्स या उत्पादनाचा आधार आहे. जेवणापूर्वी घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या सप्लिमेंटमध्ये १४ नैसर्गिक कडू वनस्पतींचा समावेश आहे. हे उत्पादन भूक आणि खाण्याची इच्छा कमी करण्यास मदत करून वजन नियंत्रणात ठेवण्यास सहाय्य करते.
भारतात लठ्ठपणाचे प्रमाण वाढत असतानाच हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (एनएफएचएस)-६’नुसार, देशातील सुमारे ३० टक्के महिला आणि २७ टक्के पुरुष हे जादा वजनाचे किंवा लठ्ठ आहेत. लठ्ठपणाचा परिणाम केवळ शारीरिक आरोग्यावरच होत नसतो, तर आत्मविश्वास, नातेसंबंध, करिअरच्या संधी आणि एकूणच जीवनमानावरही होऊ शकतो.
अधिक माहितीसाठी पुढील लिंक्सवर क्लिक करा –
https://www.instagram.com/arthbitterdrops/
https://www.youtube.com/@ARTHBitterDrops


