Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedचातुर्मासानिमित्त 'दगडूशेठ' गणपती ट्रस्टतर्फे कीर्तन महोत्सव* श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती...

चातुर्मासानिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे कीर्तन महोत्सव* श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन ;

 

ह.भ.प.डॉ. जयवंत महाराज बोधले, ह.भ.प.केशव महाराज नामदास यांच्यासह महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांचा सहभाग

 

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांतील दिग्गज कीर्तनकार सहभागी होणार आहेत. कीर्तन महोत्सव दि. १ ते ९ आॅगस्ट दरम्यान आपटे रस्त्याजवळील हॉटेल सेंट्रल पार्क येथे दररोज सायंकाळी ५.३० वाजता होणार असून सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.

 

चातुर्मासानिमित्ताने शनिवारपासून (दि.१ आॅगस्ट) अनुक्रमे नाशिक येथील वारकरी भूषण श्रीगुरु ह.भ.प.चैतन्य महाराज निंबोळे, आळंदी येथील ज्ञानेश्वरी कंठभूषण ह.भ.प.ओंकार महाराज दुडे शास्त्री, आळंदी साधकाश्रम येथील ह.भ.प.यशोधन महाराज साखरे, पंढरपूर येथील संत नामदेव महाराज यांचे १६ वे वंशज ह.भ.प.केशव महाराज नामदास, डोंबिवली येथील श्रीमलंग गड येथील आॅनलाईन कीर्तन गुरुकुलाचे संस्थापक ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत, परभणी मानवत येथील वारकरीभूषण ह.भ.प. उमेश महाराज दशरथे आणि पंढरपूर येथील मानकोजी महाराज बोधले यांचे ११ वे वंशज ह.भ.प.डॉ. जयवंत महाराज बोधले यांचे कीर्तन ऐकण्याची संधी मिळणार आहे.

 

शनिवार, दि.८ आॅगस्ट रोजी जगद्गुरु फाऊंडेशनचे संस्थापक जगद्गुरुकृपांकित ह.भ.प.डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. तसेच महोत्सवाचा समारोप रविवार, दि. ९ आॅगस्ट रोजी होणार असून ह.भ.प. भावार्थ महाराज देखणे यांचा भारुडाचा कार्यक्रम होईल. केंद्र सरकारचा उस्ताद बिस्मिला खान युवा पुरस्कार २०२४ हा भारुड कलेसाठी डॉ.देखणे यांना मिळाला आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतील नामवंत कीर्तनकारांना ऐकण्याची व यामाध्यमातून स्वरब्रह्माची अनुभूती घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. महोत्सवाला प्रवेश खुला असून कीर्तनांचा पुणेकरांनी आनंद घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments