पुणे, दि. ३० (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत एन्युमरेशन फॉर्म भरण्याची मुदत ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविली आहे. त्यामुळे २१४ पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील सर्व पात्र मतदारांनी आपला एन्युमरेशन फॉर्म तातडीने भरून घ्यावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी केले आहे.
मतदारांनी एन्युमरेशन फॉर्म ऑफलाईन पद्धतीने संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे किंवा ऑनलाईन पद्धतीने voters.eci.gov.in या संकेतस्थळावर भरावा. तसेच फॉर्म भरण्याबाबत कोणतीही अडचण अथवा अधिक माहितीसाठी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा.
मुदतीत एन्युमरेशन फॉर्म न भरल्यास संबंधित मतदाराचे नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होणार नाही. त्यामुळे सर्व पात्र मतदारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता तातडीने एन्युमरेशन फॉर्म भरून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहनही मतदार नोंदणी अधिकारी श्री. भंडारे यांनी केले आहे.
0000


