पुणे,28 मार्च 2023 : इको लॅब कंपनीचा भाग असलेल्या व जल व्यवस्थापन उपाय आणि सेवा प्रदान करणार्या व जागतिक पातळीवरील शाश्वतता क्षेत्रात आघाडीची पुणे स्थित कंपनी नॅल्को वॉटर ने आपल्या नाविन्यपूर्ण जल व्यवस्थापन सोल्युशन्समुळे भारतातील लिंडस्ट्रॉम समूह या कापड उद्योगातील आघाडीच्या कंपनीला शुध्द पाण्याचा वापर कमी करण्यास मदत करत मोठे यश प्राप्त केले आहे.या भागीदारीमुळे अॅक्वाईस्ट वॉटर रिसायकलिंग प्रकल्प कार्यान्वित झाला असून शाश्वत जल व्यवस्थापनात हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारत हा भूजलाचा सर्वांत मोठा वापरकर्ता असलेला व सर्वांत जास्त पाण्याच्या समस्या असलेल्या देशांपैकी एक असून या मौल्यवान संसाधनांचे जतन करण्याची त्वरित आवश्यकता आहे.हे लक्षात घेता नॅल्को वॉटर आणि लिंडस्ट्रॉम समुहाने अॅक्वाईस्ट प्रकल्पाद्वारे शुध्द पाण्याचा वापर कमी करण्यात लक्षणीय प्रगती केली आहे.अवघ्या एका वर्षात लिंडस्ट्रॉम ने आपल्या चेन्नई प्रकल्पात लक्षणीय प्रमाणात म्हणजे 74 टक्के पाणी पुर्नप्राप्त केले आहे आणि शुध्द पाण्याचा एकूण वापर 56 टक्क्यांनी कमी केला आहे.या अॅक्वाईस्ट प्रकल्पाचे प्रभावी परिणामाचे रूपांतर वर्कवेअर आणि क्लीन रूम ऑपरेशन्समध्ये संभाव्य वार्षिक 330 दशलक्ष लीटर पाण्याच्या बचतीमध्ये होऊ शकेल.
नॅल्को वॉटरच्या नाविन्यपूर्ण जल व्यवस्थापन सोल्युशन्समुळे भारतातील लिंडस्ट्रॉम समुहाला शुध्द पाण्याचा वापर कमी करण्यास मदत
RELATED ARTICLES


