गुरूग्राम, भारत – मार्च २८, २०२४ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज मोबाइल एआयला अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या आणखी गॅलॅक्सी फ्लॅगशिप डिवाईसेसमध्ये गॅलॅक्सी एआय वैशिष्ट्ये लाँच करण्याची घोषणा केली. हे सादरीकरण आजपासून सुरू होत आहे आणि गॅलॅक्सी एस२३ सिरीज, एस२३ एफई, झेड फोल्ड५, झेड फ्लिप५ व टॅब एस९ सिरीजमध्ये उपलब्ध असेल. नुकतेच लाँच करण्यात आलेल्या गॅलॅक्सी एस२४ सिरीजशी संलग्न राहत हे अपडेट वापरकर्त्यांच्या मोबाइल एआय अनुभवाचा दर्जा उत्साहित करते.
गॅलॅक्सी एआय वैशिष्ट्यांच्या सादरीकरणासह गॅलॅक्सी एस२३ सिरीज, एस२३ एफई, झेड फोल्ड५, झेड फ्लिप५ व टॅब एस९ सिरीजचे वापरकर्ते आता सर्कल टू सर्च, लाइव्ह ट्रान्सलेट आणि नोट असिस्ट अशा अनेक वैशिष्ट्यांचा लाभ घेऊ शकतील. गॅलॅक्सी इकोसिस्टममध्ये मोठ्या प्रमाणात समाविष्ट करण्यात आलेले गॅलॅक्सी एआय एआय-सपोर्टेड मॉडेल्सवरील दैनंदिन टास्क्समध्ये साह्य करत युजर अनुभव वाढवते, ज्यामधून कार्यक्षमतेच्या नवीन स्तराचा अनुभव मिळतो.
डिस्प्लेवर कोणतीही इमेज सर्कल, हाइलाइट किंवा टॅप केल्यास गुगलसह सर्कल टू सर्च माहितीपूर्ण, उच्च दर्जाची गुगल सर्च निष्पत्ती तयार करते.
लाइव्ह ट्रान्सलेट द्विमार्गी, रिअल-टाइम वॉईस आणि फोन कॉल्सचे मजकूर भाषांतर तयार करते, ज्यामुळे प्रवास करण्यासाठी रिझर्व्हेशन्स बुक करणे किंवा तुमच्या आजीआजोबांसोबत त्यांच्या मातृभाषेत चॅटिंग करणे सोपे झाले आहे.
नोट असिस्ट एआय-निर्मित सारांश, प्री-फॉर्मेटेड टेम्पलेट्स व कव्हर पेजेस् निर्माण करू शकते, ज्यामुळे तुमच्या दैनंदिन उत्पादकतेमध्ये अधिक उत्साहाची भर होते. चॅट असिस्ट उत्तम कम्युनिकेशनच्या खात्रीसाठी संदर्भ-केंद्रित सल्ले देत परिपूर्ण संवाद होण्यास मदत करू शकते, सह-कर्मचारीला संदेश पाठवायचा असो किंवा सोशल मीडिया कॅप्शनसाठी लहान लक्षवेधक फ्रेज तयार करायची असो उत्तम सुविधेची खात्री मिळते.
इंटरप्रीटर युजर-फ्रेण्डली स्प्लिट-स्क्रिन व्ह्यूच्या माध्यमातून त्वरित लाइव्ह संवादांचे भाषांतर करू शकते, ज्यामुळे एकमेकांच्या समोर उभ्या असलेल्या व्यक्ती दुसरी व्यक्ती सांगत असलेल्या मजकूराचे भाषांतर वाचू शकतात. ट्रान्स्क्रिप्ट असिस्ट एआय आणि स्पीच-टू-टेक्स्ट तंत्रज्ञानाचा वापर करत वॉइस रेकॉर्डिंग्ज ट्रान्स्क्राइब, सारांश व भाषांतर करते. ब्राऊजिंग असिस्ट जगभरात सुरू असलेल्या घडामोडींबाबत अद्यायवत राहण्यास मदत करते, तसेच बातम्यांचे लेख किंवा वेब पेजेसचे सारांश तयार करत वेळेची बचत करते.
जनरेटिव्ह एडिट फोटो काढल्यानंतर फोटोमधील वस्तूंचा आकार व स्थान बदलत क्रिएटिव्ह लुक देण्यास मदत करते. एडिट सजेशन तुमच्यासाठी वैयक्तिक फोटो एडिटर आहे, जो एआयचा वापर करत प्रत्येक फोटोसाठी अनुकूल ट्विक्सचा सल्ला देतो.
ग्राहक फक्त ९९,९९९ रूपयांमध्ये गॅलॅक्सी एस२३ अल्ट्रा खरेदी करू शकतात, ज्यामध्ये एचडीएफसी बँकेची ५००० रूपयांची कॅशबॅक आणि ५००० रूपयांच्या अतिरिक्त अपग्रेड बोनसचा समावेश आहे. गॅलॅक्सी एस२३ ५५,९९९ रूपयांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये एचडीएफसी बँकेची ५००० रूपयांची कॅशबॅक आणि ४००० रूपयांच्या अतिरिक्त अपग्रेड बोनसचा समावेश आहे. तसेच, गॅलॅक्सी एस२३ एफई आता एचडीएफसी बँकेची ५००० रूपयांची कॅशबॅक आणि ५००० रूपयांच्या अतिरिक्त अपग्रेड बोनससह फक्त ४४,९९९ रूपयांमध्ये उपलब्ध आहे.
गॅलॅक्सी झेड फोल्ड५ हा १,३८,९९९ रूपयांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये एचडीएफसी बँकेची ७००० रूपयांची कॅशबॅक आणि ९००० रूपयांच्या अतिरिक्त अपग्रेड बोनसचा समावेश आहे. गॅलॅक्सी फ्लिप५ आता एचडीएफसी बँकेची ७००० रूपयांची कॅशबॅक आणि ७००० रूपयांच्या अपग्रेड बोनससह ८५,९९९ रूपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.
गॅलॅक्सी टॅब एस९ सिरीज ६०,९९९ रूपयांच्या सुरूवातीच्या किमतीमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये एचडीएफसी बँकेची ९००० रूपयांची कॅशबॅक आणि ३००० रूपयांचा अतिरिक्त अपग्रेड बोनसचा समावेश आहे.
ग्राहक आता सॅमसंग फायनान्स+ आणि सर्व आघाडीच्या एनबीएफसी सहयोगींच्या माध्यमातून प्रतिमहिना फक्त २२९२ रूपयांपासून सुरू होणाऱ्या ईएमआयमध्ये, तसेच जवळपास २४ महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआयमध्ये गॅलॅक्सी एआय वैशिष्ट्यांचा अनुभव घेऊ शकतात.


