Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedइकॉस (इंडिया) मोबिलिटी अँड हॉस्पिटॅलिटी लिमिटेडतर्फे आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी सादर

इकॉस (इंडिया) मोबिलिटी अँड हॉस्पिटॅलिटी लिमिटेडतर्फे आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी सादर

भारतातील कॉर्पोरेट्ससाठी सर्वात मोठे आणि सर्वाधिक फायदेशीर चालक-प्रणीत दळणवळण पुरवठादार इकॉस (इंडिया) मोबिलिटी अँड हॉस्पिटॅलिटी लिमिटेड (“द कंपनी”) ने आर्थिक वर्ष २०२३ साठी कामकाजातून महसूल आणि करपश्चात नफ्याच्या बाबतीत (स्रोत: F&S अहवाल) सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला आहे. हा डीआरएचपी प्राथमिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) प्रत्येकी २ रु. (“इक्विटी शेअर्स”) दर्शनी मूल्य असलेल्या १८,०००,००० पर्यंतच्या इक्विटी शेअर्ससाठी आहे.

कंपनीचे प्रवर्तक राजेश लूंबा, आदित्य लूंबा, राजेश लूंबा फॅमिली ट्रस्ट आणि आदित्य लूंबा फॅमिली ट्रस्ट आहेत.

ऑफरमध्ये १८,०००,००० पर्यंतचे इक्विटी शेअर्स (“ऑफर केलेले शेअर्स”) ची ऑफर फॉर सेल (OFS) असून यात राजेश लूम्बा यांच्या ९,९००,००० पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि आदित्य लूम्बा (“विक्री समभागधारक”) (“विक्रीसाठी ऑफर”) द्वारे ८,१००,००० पर्यंतचे इक्विटी शेअर्स यांचा समावेश आहे.

कंपनी २५ वर्षांहून अधिक काळ भारतातील फॉर्च्युन 500 कंपन्यांसह कॉर्पोरेट ग्राहकांना शोफर्ड कार रेंटल (“CCR”) आणि कर्मचारी वाहतूक सेवा (“ETS”) सेवा प्रदान करत आहे. कंपनीकडे ९,००० हून अधिक इकॉनॉमी पासून लक्झरी कार, मिनी व्हॅन आणि लक्झरी कोचेस पर्यंतचा ताफा आहे. त्यामध्ये लक्झरी वाहने (ऑडी, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज-बेंझ सारख्या ऑटोमोबाईल ब्रँडच्या वाहनांसह), इकॉनॉमी वाहने, प्रीमियम वाहने आणि बस/व्हॅन अशा विविध श्रेणींचा समावेश आहे. विशेष वाहने जसे की लगेज व्हॅन, लिमोझिन, विंटेज कार आणि दिव्यांग लोकांसाठी सुलभ वाहतुकीकरिता वाहने देखील आहेत.

कंपनी माहिती तंत्रज्ञान, व्यवसाय प्रक्रिया आऊटसोर्सिंग, जागतिक क्षमता केंद्रे (GCCs), सल्ला सेवा, आरोग्यसेवा, ई-कॉमर्स, फार्मास्युटिकल, कायदा आणि उत्पादन यासारख्या विविध उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या ग्राहकांना सेवा देखील देते. त्यामध्ये एचसीएल कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स लिमिटेड, थॉमस कूक, इंडिया, डब्ल्यूएम ग्लोबल टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (वॉलमार्ट ग्लोबल टेक), व्हीआरबी कंझ्युमर प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, पिंकर्टन कॉर्पोरेट रिस्क मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, मेडजेनोम, लॅब्स लिमिटेड, ड्रीमफोल्क्स सर्व्हिसेस लिमिटेड, मर्सर कन्सल्टिंग, एफएनएफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (फिडेलिटी), exl Service.com (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड आणि VA टेक वाबॅग लिमिटेड यांचा समावेश आहे.

इक्वीरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड आणि आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments